हवामान खात्याकडून दिलासादायक बातमी ! राज्यात ‘या’ भागात आज पुन्हा वरुणराजा बरसणार

Rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकर्‍यांनी पेरणी करायला सुरुवात केली होती त्यानंतर मात्र. मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी मात्र चिंतेत सापडला आहे. राज्यातील अनेक भागात पावसाविना दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांपुढे ओढवले आहे. पण आता हवामान विभागाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्यातील काही भागामध्ये पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

हवामान विभागाचे तज्ञ् के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, बीड, उस्मानाबाद, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम ते तीव्र गदारांच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 3 -4 तास हा पाऊस वरील भागात पुन्हा आगमन करेल असे होसाळीकर यांनी सांगितले आहे.

राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज सोमवारी (दि. 28) तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची (rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पुढील आठवड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. तर मंगळवारनंतर (दि. 29) राज्यभरात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे.

कृषी मंत्र्यांचा पेरणीबाबत महत्वाचा सल्ला

राज्यात सध्या काही ठिकाणी पेरणीला सुरुवात झाली असून 22 जुन पर्यंत राज्यात सुमारे 27 टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत 38 टक्के पेरण्या झाल्या होत्या. शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये . असा महत्वाचा सल्ला कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिला आहे.