ई – पीक पाहणीकरिता कॉल सेंटरची स्थापना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी खातेदार यांना ई -पीक पाहणी सेवेसाठी कॉल सेंटर सेवा सुरू करण्यात आलेली आहे. त्याद्वारे नागरिकांना उपलब्ध करून दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून आपल्या शंकांचे निरसन करून घेता येणार आहे. नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन जमाबंदी आयुक्त एन के सुधांशू यांनी केला आहे.

पुण्यातील भूमिअभिलेख विभागातील जमाबंदी आयुक्त आणी संचालक भूमी अभिलेख मुख्यालयामध्ये मदत कक्ष तक्रार निवारण व कॉल सेंटर सुविधांचा प्रारंभ गुरुवारी करण्यात आला. या कार्यक्रमास अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आनंद राहते भूमी अभिलेखाचे उपसंचालक किशोर कवरेज उपसंचालक बाळासाहेब काळे राज्य समन्वयक रामदास जगताप वरिष्ठ तांत्रिक सल्लागार समीर दातार व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. जमाबंदी आयुक्त एन के सुधांशू म्हणाले की “कॉल सेंटर बरोबरच जीआयएस तसेच आयटी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर भूमिअभिलेख विभाग करणार आहे. सर्व कर्मचारी अधिकारी यांनी विभागाच्या प्रकल्पांमध्ये उस्फुर्त सहभाग घेऊन लोकाभिमुख आणि जास्तीत जास्त चांगल्या सेवा देण्यासाठी या प्रकल्प नियंत्रण कक्षाची मदत होणार आहे. त्यासाठी 0202 52 172 17 हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सातबारा संगणकीकरण, ई फेरफार, ई-मोजणी, ई – प्रॉपर्टी कार्ड, नकाशांचे डिजिटलायझेशन, ई पीक पाहणी, स्वामित्व योजना अशा प्रकल्पांच्या माध्यमातून कामाची कार्यक्षमता वाढवून पारदर्शकता आणि जबाबदारीने सेवा देण्यावर भर दिला आहे. सर्व आधुनिकीकरणाचे प्रकल्प संपूर्ण राज्यभर राबवत असताना जनसामान्यांत बरोबरच विभागातील क्षेत्र कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शनाची गरज भासते. तसेच सामान्य जनतेला सेवा मिळवताना येणाऱ्या अडचणी तक्रारी तसेच इतर प्रश्‍न उत्तरांसाठी भूमिअभिलेख विभागाने मदत कक्ष तक्रार व्यवस्थापन प्रणाली तसेच कॉल सेंटरची स्थापना केली आहे.