हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना आता कोणतीही माहिती , योजना , सरकारी कामे करण्यासाठी पूर्वीप्रमाणे धावपळ करण्याची गरज नाही कारण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता सर्वकाही मोबाईलद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहचत आहे. नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई -पीक पहाणी मोबाईल अप्लिकेशनचे ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमादरम्यान एका माहितीपटाचे प्रसारण करण्यात आले. हा माहितीपट ‘प्रभारंग फिल्म्स्’ यांच्या द्वारे निर्मित केला गेला. या माहितीपटाचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादासाहेब भुसे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, मुख्य सचिव सीताराम कुंटे आदी उपस्थित होते. तसेच सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी देखील या सोहळ्यात ऑनलाईन सहभागी झाले होते. यावेळी माहितीपट बनवण्यासाठी आपण घेतलेल्या मेहनतीचे चीज झाल्याची भावना प्रभारंगचे दिग्दर्शक संदीप पांडुरंग माने यांनी ‘हॅलो कृषी’ सोबत बोलताना व्यक्त केली.
याबाबत बोलताना ते म्हणाले , नुकतंच ई पीक पाहणी प्रकल्पाच्या माहितीपटाचं अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत सह्याद्री भवनात झालं आणि राज्याच्या ऐतिहासिक क्षणांत आमचंही नाव कोरलं गेलं. महसूल व वन विभागाच्या राज्यभरातील सर्व अधिकार्यांनी या ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होत हा माहितीपट पाहिला आणि तत्परतेनं मेसेज फोनद्वारे फीडबॅक देऊन कौतुकाची पोचपावतीही दिली. अशी प्रतिक्रिया प्रभारंगच्या संदीप माने यांनी दिली आहे.
हा माहितीपट बनवण्यासाठी संहिता लेखक, निर्मिती प्रमुख उर्मिला चोपडा-हिरवे, छायाचित्रकार अमेय चव्हाण, सहाय्यक छायाचित्रकार शरद डहाळे, ड्रोन छायाचित्रकार नितीन हिरडे, संगीतकार पार्थ उमराणी, निवेदक अनिरुद्ध दडके, संकलक युवराज ब्राह्मणी कर याची साथ मिळाली.
माहितीपट पाहण्यासाठी क्लीक करा :