रब्बीचा पेरा लांबला …! काय होईल उत्पादनावर परिणाम?

Rabbi Sowing
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी खरीप हंगाम सुरु झाल्यापासून आता कुठे पावसाने कुठे उघडीप दिली आहे. मात्र या बदलत्या हवामानाचा मोठा फटका हा कृषी क्षेत्राला बसला आहे. अवकाळी पावसामुळे खरीप पेरण्यांवर परिणाम झाला . रब्बीच्या पेरण्या उशिरा झाल्या. याचा एकूण परिणाम यंदाच्या वार्षिक उत्पादनावर होण्याची मोठी शक्यता आहे.

राज्यातील मराठवाड्यात सध्या सरासरीच्या क्षेत्रावर पेरा झाला आहे. यामध्ये नांदेड जिल्हा आघाडीवर आहे तर सर्वात कमी पेरा औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये झालेला आहे. यामध्ये गहू वगळता इतर सर्वच पिकंच्या पेरणीला तसा उशिरच झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात उत्पादनाबद्दल आता शंका उपस्थित होत आहे. मात्र, याचा परिणाम उत्पादनावर होणार नाही तर योग्य ती काळजी घेतल्यास उलट उत्पादनात वाढ होणार असल्याचे कृषी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कदम यांनी एका टीव्ही माध्यमाशी बोलताना सांगितले आहे. यंदाच्या रब्बी हंगामासाठी मराठवाड्यातील औरंगाबाद व लातूर कृषी विभागांतील आठ जिल्ह्यांत 16 लाख 91 हजार 140 हेक्‍टर सरासरी क्षेत्र आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात 17 लाख 14 हजार 4 हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. अर्थात, संपूर्ण मराठवाड्याचा विचार करता पेरणी सरासरीपेक्षा अधिक झाली आहे. परंतु प्रत्यक्षात आठपैकी चार जिल्ह्यांत अजूनही अपेक्षित क्षेत्रावर पेरणी होणे बाकी आहे. यामध्ये 1 लाख 40 हजार 223 हेक्टरावर नांदेड जिल्ह्यात पेरा झाला आहे.

हरभऱ्याचा पेरा अधिक
रब्बी हंगामात ज्वारी हे मुख्य पीक होते पण बदलते वातावरण आणि उत्पादनाचा विचार करता पिकपध्दतीमध्ये बदल होत आहे. यातच यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झालेला आहे. त्यामुळे कृषी विभागाने केलेल्या अवाहनानुसार हरभऱ्याचाच अधिक पेरा झाला आहे. तर ज्वारीच्या क्षेत्रामध्ये कमालीची घट झाली आहे. हरभरा पाठोपाठ गव्हाचा पेरा झाला असून अजून काही दिवस गव्हाची पेरणी ही सुरुच राहणार आहे. रब्बी हंगमात यंदा नव्याने राजमा पिकाच्या क्षेत्रातही वाढ झाली आहे.

शेतकरी मित्रांनो हे पण वाचा :

दुसऱ्याच्या शेतातून पाईपलाईन किंवा जलमार्ग बांधायचा असल्यास ,काय आहे कायदेशीर मार्ग ?

पशुसंवर्धन विभागाकडून विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज मागवणे सुरु , जाणून घ्या माहिती

शेतकऱ्यांनो तुमच्या शेतावर आहे तुमचा हक्क…! ‘हे’ मूलभूत अधिकार माहिती असलेच पाहिजेत, जाणून घ्या