डाळींबाचे पाणी व्यवस्थापन कसे करावे? जाणुन घ्या खास Tips

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : डाळींबाला उथळ पाणी देऊ नये, त्याला खोलवर ओलावा गरजेचा असतो परंतू ९५% वाफसा व ५% वेळ ओलावा असावा म्हनजेच कमीत कमी वेळेत जास्त पर्क्युलेशन करन्याची व्यवस्था असावी डाळींब पिकात ६ किंवा ८ लिटर / ताशी चे ड्रीपर वापरावे. इनलाईन ड्रीपर ऐवजी ओनलाईन ड्रीपर जास्त उपयुक्त ठरतात.

डाळींब पिकाला हलक्या जमिनित २.५ तास आठवड्यातून दोन किंवा तिन वेळेस व भारी जमिनित २ तास आठवड्यातून.जास्तित जास्त दोन वेळेस पाणी द्यावे. ज्यावेळी आम्ही पाणी कमी करा असे सुचवतो तेव्हा पाण्याचे तास कमी न करता दोन पाळ्यांमधील दिवस वाढवणे अपेक्षीत असते.

पाण्याचे लिटर कमी केल्यास पिकावर ताण निर्माण होऊ शकतो

दिवसांचा अंतराल ( गॅप ) वाढविल्याने झाड संतुलन करन्यास प्रवृत्त होते व अधीक कणखर बनते.
डाळींब हे दुष्काळी व कोरड्या हवामानातील पिक असल्याने त्याच्यात पाणी धरूण ठेवन्याची क्षमता असते फक्त त्यासाठी जमिनित ह्युमस चे प्रमाण टिकवून ठेवने अत्यंत महत्त्वाचे ठरते , सोबत विविध कडब्यांची ( बाजरी, मका , ज्वारी ) कुट्टी ड्रीपरवर मल्चिंग करून टाकने अत्यंत फायदेशीर ठरत आहे. या वर्षी च्या सर्व कही वापरूनही रोग वाढल्याचे २-३ % बागांमध्ये लक्षात आल्यानंतर तिन प्रमुख कारणे समोर आले …

१. रासायनिक फवारण्यांचा अतिरीक्त व अनावश्यक वापर
२. बेसल डोस पिकाच्या आवश्यकतेपेक्षा कमी भरने
३ . पाण्याचा अति वापर किंवा अती ताण
पाण्याचा अती वापराने म्हनजे रोज किंवा दिवसाआड पाणी देणे , ३-४ तास पाणी देणे , फ्लोचे पाणी सोडने होय
मुळीचे क्षेत्र सतत ओले ठेवने म्हनजे मर , नेमॅटोड , तेल्या , डाग यांना आमंत्रणच होय. पाण्याचे नियोजन करताना आपन पाण्याचा पिएच , टीडीएस व ईसी तपासला तर असे लक्षात येईल की ते पाणी पिकाला जास्त देणे म्हनजे विष दिल्यासारखे आहे.
पाण्याचा पिएच हा साडेसहा ते साडेसात , टीडीएस ३००-४०० असायला हवा परंतू तो यापेक्षा जास्त आढळून आल्याने पिकावर पाण्यातील जास्तीच्या पीएच व टीडीएस चे विषाक्त परिणाम होतात.

बिबट्याचा थरारक हल्ला! अचानक समोर बिबट्या आला तर काय करावं? । Leopard Attack । Tiger Attack

“ चला , पाणीच तर आहे , कितीही दिले तर त्याला काय होतेय “ असे म्हनून चालनार नाही.मित्रहो ,

आपन क्षापरट पाणी पिकांना देत आहोत , आजकाल आपन घरात आरओ चे मशीन मधून फिल्टर करून पाणी घेतोय कारण ते थेट पिण्यायोग्य राहीलेले नाहीये मग ते पिकांना तसेच सुरक्षीत कसे असू शकते
४/५ वर्षांपुर्वी मातीत ओरगॅनिक कार्बन होता जो पाणी फिल्टर करून पिकाला उपलब्ध करून देत होता , आज कार्बन नसल्यात जमा आहे त्यामुळे ते क्षारयुक्त जसेच्या तसे पिकात उचलले जाते व पिकावर दुष्परिणाम करतेय.

आपन जर वाटर सोल्यूबल खते सोडत असाल तर आपल्या ड्रीपरजवळ पांढरे थर तयार होतात ज्यामुळे ड्रीपर चा डिस्चार्ज कमी होतो किंवा ते बंदही पडतात.

शरद केशवराव बोंडे