Accident News : टोमॅटोने गच्च भरलेला ट्रक महामार्गावर झाला पलटी; त्यानंतर…

Accident News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

धुळे । टोमॅटोने गच्च भरलेला एक ट्रक महामार्गावर पलटी होऊन मोठा अपघात (Accident News) झाला आहे. नाशिकहून जळगावकडे जाताना धुळे शहराच्याजवळ सदर अपघात झाला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. ट्रक पलटल्यानंतर रस्त्यावर लाल टोमॅटो पसरून लाल चिख्खल झाला होता.

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथून जळगावकडे टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक धुळे शहराजवळ उलटला आहे. टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने रस्त्यावर टोमॅटोचा चिखल झाल्याचे पाहायला मिळाले. सर्वत्र टोमॅटो पसरले होते. ही घटना शहरातील पारोळा चौफुली जवळ घडली.

टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक उलटल्यामुळं शेतकऱ्याचे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. पहाटेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास टोमॅटोचा ट्रक उलटून अपघात झाला. ट्रकचे स्पेअर पार्ट तुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना शहरातील पारोळा चौफुली जवळ घडली. यामध्ये शेतकऱ्याचे मोठं आर्थिक नुकसान