हॅलो कृषी ऑनलाईन: देशातील बहुतेक शेतकरी आता पारंपरिक पद्धतीऐवजी एरोपोनिक (Aeroponic Potato Farming) पद्धतीने शेती करत आहेत आणि त्यात ते यशस्वीही होत आहेत. शेतकरी एरोपोनिक पद्धतीचा वापर करून हवेत बटाट्याची लागवड करत त्यातून चक्क 10 पट अधिक उत्पन्न मिळत आहे (Aeroponic Potato Farming).
भारतातील 75 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. काळानुसार शेतीच्या पद्धतीही (Farming Methods) बदलू लागल्या आहेत. शेती सुधारण्यासाठी नवनवीन शोध (New Agriculture Technology) लावले जात आहेत. यामुळे भारतीय शेतकरी आता तंत्रज्ञानाच्या बाबतीत युरोप, अमेरिकेसारख्या प्रगत देशांशी स्पर्धा करू लागले आहेत. देशातील बहुतांश शेतकरी आता पारंपरिक पद्धतीऐवजी एरोपोनिक पद्धतीने शेती करत आहेत आणि त्यात ते यशस्वीही होत आहेत. शेतकरी एरोपोनिक पद्धतीचा वापर करून हवेत बटाट्याची लागवड (Aeroponic Potato Farming) करत असून त्यातून 10 पट उत्पन्न मिळत आहे. जाणून घेऊ या एरोपोनिक शेती म्हणजे काय आणि या तंत्राने बटाट्याची लागवड (Aeroponic Potato) कशी केली जाते?
एरोपोनिक शेती म्हणजे काय? (Aeroponic Farming)
एरोपोनिक तंत्रज्ञान अशी पद्धत आहे ज्यासाठी शेतकर्याला माती (Agriculture Without Soil) आणि जमिनीची गरज नसते. शेतकरी बटाट्याला त्यांच्या लटकलेल्या मुळांपासून पोषण देतात. घराच्या छतावरच एरोपोनिक पद्धतीने शेती करता येते. या तंत्रात, लटकलेल्या मुळांवर पोषक द्रव्ये फवारली जातात आणि झाडाचा वरचा भाग मोकळ्या हवेत आणि प्रकाशात राहतो. जेव्हा एरोपोनिक पद्धतीने बटाट्याची लागवड केली जाते तेव्हा पहिले पीक येण्यासाठी 70 ते 80 दिवस लागतात. या पद्धतीने शेती करणे शेतकऱ्यांना खूप फायदेशीर ठरू शकते, कारण कमी खर्चात आणि कमी जागेत शेती करून शेतकरी बटाट्याचे चांगले उत्पन्न मिळवू शकतात. अधिक पीक उत्पादनामुळे शेतकर्यांचे उत्पन्नही वाढते.
एरोपोनिक सिस्टम खर्च (Aeroponic Potato Farming Expenditure)
एरोपोनिक फार्मिंग सिस्टीम बसवणे शेतकऱ्यांना सुरुवातीला महाग वाटेल, पण एकदा ते बसवल्यानंतर ते सहजासहजी मोठी कमाई करू शकतात. बटाटा तंत्रज्ञान केंद्राच्या मते, शेतकरी एरोपोनिक पद्धतीने बटाट्याची लागवड करून खूप चांगल्या दर्जाचे उत्पादन घेतात. याशिवाय बटाट्याची झाडेही वेगाने वाढतात आणि त्यांना कमी पाणी लागते.
एरोपोनिक शेती कशी करावी? (Aeroponic Potato Farming)
- एरोपोनिक फार्मिंग पद्धतीने आधुनिक आणि वैज्ञानिक अशा दोन्ही प्रकारे शेती करता येते.
- या तंत्राने शेती करण्यासाठी, शेतकऱ्यांना प्रथम बटाट्याचे सुधारित वाण निवडावे लागते आणि त्याची रोपे रोपवाटिकेत तयार केली जातात.
- यानंतर ही रोपे बागकाम युनिटमध्ये न्यावे लागेल. आता तयार केलेल्या बटाट्याच्या रोपाची मुळे बावस्टीनमध्ये बुडवली जातात, ज्यामुळे बुरशीचा धोका कमी होतो.
- यानंतर, शेतकऱ्यांना बेड तयार करावा लागतो, त्यानंतर रोपे लावली जातात.
- जेव्हा बटाट्याची झाडे 10 ते 15 दिवसांची असतात, तेव्हा बटाट्याची रोपे एरोपोनिक युनिटमध्ये लावली जातात.
- या पद्धतीमुळे बटाटा पिकापासून कमी वेळेत जास्त उत्पादन मिळते.
एरोपोनिक पद्धतीने बटाट्याची शेती करण्याचे फायदे (Aeroponic Potato farming Benefits)
- या पद्धतीने शेती केल्यास शेतकरी पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत बटाट्याचे 10 पट अधिक उत्पादन घेऊ शकतात.
- एरोपोनिक शेती पद्धतीचा वापर करून शेती केल्याने शेतकर्यांचे उत्पन्नही 10 पटीने वाढते.
- या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकरी आपल्या घराच्या गच्चीवरही बटाट्याची लागवड करू शकतात.
- या तंत्राचा वापर करून लागवडीसाठी, नर्सरीमध्ये बटाट्याची रोपे तयार केली जातात आणि ही रोपे एरोपोनिक युनिटमध्ये लावली जातात.