Agricultural Mortgage Loan Scheme : बारामती बाजार समितीमध्ये शेतमाल तारण कर्ज योजना सुरू; योजनेत `या´ पिकांचा समावेश

Agricultural Mortgage Loan Scheme
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हेलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांचा शेतमाल काढणी हंगाम चालु झाल्या बरोबर मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी येत असल्याने शेतमालाचे बाजारभाव खाली येऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. सदर शेतमाल साठवणूक करून काही कालावधी नंतर विक्री केल्यास त्या शेतमालाची वाढलेल्या भावाने विक्री होऊन शेतकऱ्यांना जादा दर मिळु शकतो. ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांना रास्त बाजारभाव मिळावा या दृष्टीकोनातुन बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीने पणन मंडळाने दरवर्षी प्रमाणे सन 2024-2025 या हंगामा करिता शेतमाल तारण कर्ज योजना सुरू केली आहे. या शेतमाल तारण कर्ज योजनेचा (Agricultural Mortgage Loan Scheme) शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा, असे आवाहन सभापती सुनिल पवार व उपसभापती निलेश लडकत यांनी केले आहे.

शेतमाल तारण कर्जाची मुदत किती? Agricultural Mortgage Loan Scheme

शेतमाल तारण कर्ज योजने अंतर्गत बाजरी, गहु, ज्वारी, उडीद, सोयाबीन इत्यादी शेतीमाल स्विकारला जाईल. यासाठी बाजार समितीच्या अटी व शर्ती लागु राहतील. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यास ठेवलेल्या शेतीमालावर हमीभावा प्रमाणे किंवा चालु बाजारभावानुसार किंमतीचे 50 ते 75 टक्के कर्ज दिले जाईल. सदर तारण कर्ज बाजार समिती मार्फत द.सा.द.शे. 3 टक्के व्याजाने धनादेशा द्वारे सहा महिने मुदती करिता दिले जाईल.

आवश्यक कागदपत्रे

यासा” योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 7/12 उतारा त्यावर चालु हंगामातील पिक नोंद, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स प्रत, मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे कार्यालयात जमा करावयाची आहेत.

शेतमाल तारण कर्जाची मुदत किती?

शेतमाल तारण कर्ज योजने (Agricultural Mortgage Loan Scheme) अंतर्गत बाजरी, गहु, ज्वारी, उडीद, सोयाबीन इत्यादी शेतीमाल स्विकारला जाईल. यासाठी बाजार समितीच्या अटी व शर्ती लागु राहतील. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यास ठेवलेल्या शेतीमालावर हमीभावा प्रमाणे किंवा चालु बाजारभावानुसार किंमतीचे 50 ते 75 टक्के कर्ज दिले जाईल. सदर तारण कर्ज बाजार समिती मार्फत द.सा.द.शे. 3 टक्के व्याजाने धनादेशा द्वारे सहा महिने मुदती करिता दिले जाईल.

आवश्यक कागदपत्रे

यासा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 7/12 उतारा त्यावर चालु हंगामातील पिक नोंद, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स प्रत, मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे कार्यालयात जमा करावयाची आहेत.

शेतमालाची प्रत

शेतमाल तारण ठेवणे पुर्वी शेतकऱ्यांनी आपला माल यांत्रिक चाळणीवर स्वच्छ केलेला असावा. तसेच सदरचा शेतमाल वाळलेला व गोणपाटाच्या बारदान्यात स्विकारला जाईल. ओलावा असलेला शेतमाल स्विकारला जाणार नाही. या योजनेच्या अधिक सविस्तर माहितीसाठी बारामती बाजार समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.