हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी डिजिटल सातबारा उपक्रमात महसूल विभागाशी करार करणाऱ्या बँकांची संख्या आता 51 इतकी झाली आहे. फेरफार व खाते उतारे बँकांना ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होण्यासाठी महसूल विभागाने सुरू केलेले बँक पोर्टल आता लोकप्रिय होत आहे. राज्यात सध्या विविध बँकांच्या साडे सहा हजारांपेक्षा जास्त शाखांना या उपक्रमाचा फायदा होत आहे.
डिजिटल सातबारा उपक्रमातून मुख्यत्वे शेतकरी वर्गाला पिक कर्ज वितरणात सुलभता यावी या उद्देशाने बँकांचे सोबत महसूल विभागाने चांगला समन्वय ठेवला आहे. सध्या या उपक्रमासाठी http://g2b.mahabhumi.gov.in/banking_application/ हे वेबपोर्टल विकसित केले जात आहे.
जमाबंदी आयुक्तालयाच्या ई-फेरफार प्रकल्प राज्य समन्वयक जिल्हाधिकारी रामदास जगताप यांच्याकडून पोर्टलवर जास्तीत जास्त बँकांचा लाभ घेण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. त्यामुळे नऊ जून अखेर राज्यातील 51 बँकांची संस्थांनी सामंजस्य करार झाला आहे. शासनाची करार झालेल्या बँका आता डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उतारे खाते उतारे व फेरफार माहिती ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून घेत आहेत. या बँकांनी शेतकऱ्यांशी संबंधित आतापर्यंत सहा लाख 90 हजार कागदपत्र ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून घेतली आहेत.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी बँकांना जमाबंदी सोबत करार करावा लागतो. विशेष म्हणजे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँका यात वेगानं सहभागी होत आहेत. आतापर्यंत सातारा, पुणे, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, धुळे, बुलढाणा, परभणी, सांगली, ठाणे, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, बीड, यवतमाळ या जिल्हा बँकांचा समावेश आहे.