Agriculture News : पशुपालन करत असताना पशूंच्या आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे असते. माणसांप्रमाणे पशूंना त्यांच्या आजारबद्दल सांगता येत नाही त्यामुळे पशूंची योग्य ती काळजी घेणे खूप महत्वाचे असते. मात्र पशूंबाबत सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ही बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील चिंदर येथे तीन दिवसांत ३१ शेतकऱ्यांच्या तब्बल ४१ जनावरांचा मृत्यू झाला झाल्याची माहिती समोर आली आहे.
जनावरांचा मृत्यू झाल्याने सिंदुधुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा धक्काच बसला आहे. या जनावरांना चाऱ्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. जनावरांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी सरकारकडे मदतीची मागणी करत आहेत. (Agriculture News)
माहितीनुसार, तीन दिवसांत आतापर्यंत ३१ शेतकऱ्यांच्या जवळपास ४१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. या जनावरांना मागच्या तीन दिवसांपूर्वी अचानक त्रास जाणवत होता. यानंतर एक एक करत जनावरांचा मृत्यू होऊ लागला आणि तब्बल ४१ जनावरांचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती पशुसंवर्ध विभागाला देण्यात आली त्यानंतर त्यांनी या गोष्टीचा आढावा घेतला. चाऱ्यातून सायनाईड विषबाधा झाल्यामुळेच जनावरांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज डॉ. कांबळे यांनी व्यक्त केला.
घरबसल्या पशूंची खरेदी विक्री कशी करायची माहिती आहे का?
शेतकरी बांधवांनो तुम्हाला तुमच्या पशूंची घरबसल्या विक्री करायचीये पण कशी करावी समजत नाही. तर मग काळजी करू नका. आता लगेच प्लेस्टोअरवर जा आणि Hello Krushi नावाचे अँप मोबाईलमध्ये इंस्टाल करा. यावर तुम्हाला पशूंच्या खरेदी विक्रीबद्दल संपूर्ण माहिती समजेल. त्याचबरोबर सरकारी योजना, जमीन खरेदी विक्री, बाजारभाव, हवामान अंदाज या विषय देखील तुम्हाला माहिती मिळेल. त्यामुळे लगेचच Hello Krushi चे अँप मोबाईलमध्ये इंस्टाल करा.