हॅलो कृषी ऑनलाईन : अरबी समुद्रात येत्या काही दिवसात चक्रीवादळ धडकणार असल्यामुळे सावधान राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. आता अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने 16 मे रोजी चक्रीवादळ धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे जर हे चक्रीवादळ आलं तर मान्सूनवर देखील त्याचा परिणाम होणार आहे साधारणपणे माणसंच केरळ मध्ये एक जूनला आगमन होते. खरीप पिकाची पेरणी 15 जून पासून सुरू होते जूनमध्ये मान्सूनचा पाऊस पडल्यास त्याचा थेट परिणाम करीत पिकांच्या उत्पादनावर होईल परिणामी शेतकऱ्यांचा आर्थिक नुकसान होऊ शकतं.
In view of #CycloneTauktae warning, National Disaster Response Force (NDRF) has deployed 24 teams in Kerala, Karnataka, Tamil Nadu, Gujarat and Maharashtra. pic.twitter.com/bBEOJP7TMI
— All India Radio News (@airnewsalerts) May 14, 2021
भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार पूर्व मध्य समुद्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे त्यामुळे वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते 14 मे ते 16 मे दरम्यान समुद्र खवळलेला स्थितीत राहणार आहे.अरबी समुद्रात येत्या आठवड्यात चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे या चक्रीवादळाला म्यानमार न टाँकटाइ असं नाव दिलं आहे. केरळ गुजरात महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गुजरात किनारपट्टीला वादळा कडून नुकसान पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे
अरबी समुद्रात १६ मे ला तयार होणा-या चक्रीवादळा नुसार आयएमडीने आज, येणा-या 4 दिवसासाठी तीव्र हवामानाचे इशारे दिले आहेत. कोकणात व मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही भागात १४ ते १५मे पासून मोठा प्रभाव दिसण्याची शक्यता आहे;शनि/रविवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.रविवारी मुंबईतपण pic.twitter.com/DcTAwBiTwz
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 14, 2021
हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन त्याचे रूपांतर चक्रीवादळात होऊ शकतो. लक्षदीप आणि केरळमध्ये हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो चक्रीवादळ पुन्हा कुठल्या दिशेला जाईल हे आत्ताच सांगता येणार नाही चक्रीवादळ आल्यास त्याचा परिणाम मान्सूनवर होईल मान्सून लांबण्याची शक्यता महाराष्ट्रात सात जूनच्या दरम्यान मान्सूनचे आगमन होत असतं चक्रीवादळाच्या संभाव्य इशारा मान्सूनचे आगमन कधी होतय याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.
सुमारे चाळीस टक्के लोक अद्याप शेतीसाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे अनेक राज्यातील शेतकऱ्यांना जर मान्सून चांगला झाला तरच शेतात फायदा होऊ शकतो पण जर मान्सूनने धोका दिला तर शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावं लागतं. कारण आणखीही तिथेच सिंचनाचे पर्याय उपलब्ध नाही येत