Ambia Bahar Fal Pik Vima Yojana: आंबिया बहार फळ पीक विमा योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज! ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: आंबिया बहार ‘फळ पीक विमा योजना’ (Ambia Bahar Fal Pik Vima Yojana) सन 2024-25 मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्टॉबेरी या 9 फळपिकांसाठी 30 जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेचा जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, यासाठी जाणून घेऊ या योजनेची (Ambia Bahar Fal Pik Vima Yojana) माहिती.

आंबिया बहार फळ पीक विमा योजना (Ambia Bahar Fal Pik Vima Yojana)

आंबिया बहार फळ पीक विमा (Ambia Bahar Fal Pik Vima Yojana) योजनेत कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी सहभाग ऐच्छिक आहे. योजनेत सहभागी होणेबाबत अथवा न होणेबाबत घोषणापत्र ज्या बँकेमध्ये पिककर्ज खाते/ किसान क्रेडिट कार्ड खाते आहे तिथे जमा करणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर बँकेला देणे आवश्यक आहे. जेणेकरुन बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही. तसेच कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत (Farmers Scheme) सहभागी होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसूचित फळपिकांकरिता विहित नमुन्यातील घोषणापत्र संबंधित बँकेत सादर करणे आवश्यक राहिल. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी बॅंकांना कळविणार नाहीत, असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत असे गृहित धरण्यात येईल व या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पद्धतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल.

योजनेचे (Ambia Bahar Fal Pik Vima Yojana) नियम आणि अटी

  • अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.
  • भाडे पट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांस  नोंदणीकृत  भाडेकरार अनिवार्य आहे.
  • कोकण विभागाकरिता एका फळपीका खालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र  10 गुंठे (0.10 हे) आणि उर्वरित विभागाकरीता कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र 20 गुंठे (0.20 हे.) अशी मर्यादा राहील.
  • एका शेतकर्‍यास अधिसूचित फळपिकासाठी मृग व आंबिया बहार मिळूण जास्तीत जास्त 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे.
  • केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे.

जिल्ह्यात योजना राबवणाऱ्या कंपन्याची यादी

  • जळगाव, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, वर्धा आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी – भारतीय कृषी विमा कंपनी लि., जालना जिल्ह्यासाठी फ्युचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
  • छत्रपती संभाजीनगर, धाराशिव ,अमरावती,अकोला, नागपूर, परभणी, रायगड, नंदुरबार  जिल्ह्यासाठी – युनिवर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
  • ठाणे, पालघर, धुळे, पुणे, सांगली, लातूर, बुलढाणा, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, बीड, आणि वाशिम जिल्ह्यासाठी – बजाज अलियांन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last Date For Application)

  • द्राक्ष पिकासाठी – अंतिम तारीख 31 ऑक्टोबर, 2024 
  • मोसंबी, केळी पपई पि‍कासाठी – अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2024 
  • संत्रा, काजू, आंबा (कोकण) पिकासाठी – अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2024 
  • आंबा (इतर जिल्हे) – अंतिम तारीख 31 डिसेंबर 2024 असा आहे.
  • स्ट्रॉबेरी पि‍कासाठी – अंतिम तारीख 14 ऑक्टोबर 2024
  • डाळिंब पि‍कासाठी – अंतिम दिनांक 14 जानेवारी 2025

आवश्यक कागदपत्रे

  • बँक खाते क्रमांक
  • आधार कार्ड
  • सातबारा
  • हमीपत्र

असे करा ऑनलाईन अर्ज (Online Application Process)

  • आंबिया बहार फळ पीक विमा योजनेत (Ambia Bahar Fal Pik Vima Yojana) सहभागी होण्याकरिता  PMFBY च्या https://pmfby.gov.in संकेतस्थळास भेट द्या व आपली मराठी भाषा निवडा.
  • त्यानंतर शेतक-याकरिता लॉग इन करा’ किंवा Guest Farmer या पर्यायावर क्लिक करा.
  • अर्जदारांचे पोर्टलवर खाते नसल्यास, अतिथी शेतकरी वर क्लिक करा. सर्व तपशील योग्यरित्या भरा आणि सबमिट वर क्लिक करा. खाते तयार केले जाईल.
  • मोबाइल क्रमांक टाकून verify वर क्लिक करास्क्रीनवर एक captcha कोड दाखवला जाईल, तो टाकून Get OTP क्लिक करायचं आहे.
  • विमा योजनेतील आवश्यक फॉर्म, सर्व अर्जदाराची, पिकाची / बँकेची माहिती भरा. पुढे बँक पासबुक फोटो, डिजिटल सहीचा सातबारा उतारा व हमी पत्र अपलोड करा.
  • शेतकर्‍यांनी अधिसुचित फळपिकांच्या हवामान धोक्यांची तसेच त्यांना भरावयाच्या विमा हप्त्याची माहिती करुन घेऊन विहित मुदतीमध्ये नजिकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक / वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा.
  • आंबिया बहारातील (Ambia Bahar Fal Pik Vima Yojana) अधिसुचित योजनेच्या अधिक माहितीसाठी सबंधित विमा कंपनीचे तालुका कार्यालय किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.