काळजी घ्या …! राज्यातला ‘या’ भागात आजही उष्णतेच्या लाटेचा इशारा

Heat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यातल्या कोकण किनारपट्टी आणि मुंबईसह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात तापमान वाढ होत आहे. मुंबई आणि कोकण किनारपट्टी मध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे हवामान खात्याकडून काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. दिनांक 15 मार्च रोजी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात तीव्र उष्णतेची लाट अनुभवायला मिळाले. तर आज दिनांक 16 मार्च रोजी देखील उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे तर मुंबई ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

या राज्यात तापमान वाढ

महाराष्ट्र शिवाय उत्तर भारतात ही तापमान सातत्याने वाढत आहे. पंजाब, हरियाणा आणि राजस्थान सहित देशातील अनेक राज्यांमध्ये नागरिकांना उष्णतेची झळ सोसावी लागत आहे. तसाच गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट आली आहे. तर 17 मार्च पासून दोन-तीन दिवसात गोव्यात एक किंवा दोन ठिकाणी ढगाळ वातावरण आणि हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर विषुववृत्तीय हिंदी महासागर आणि लगतच्या नैऋत्य बंगालच्या उपसागरावर पुढील चोवीस तासांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. दिनांक 15 मार्च 19 मार्च दरम्यान अंदमान निकोबार बेटांवर वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 19 मार्च रोजी या भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यावेळी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या जिल्ह्यांना आज यलो अलर्ट
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज(१६) पालघर, ठाणे ,रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीवरील भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागाला उष्णतेचा लाटेचा इशारा देण्यात आला आहे.