बिल गेट्स बनले शेतकरी; अमेरिकेत सर्वाधिक जमिन नावावर

Bill Gates
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन | बिल गेट्स यांचा नाव आपण फार वेळा ऐकतो. यामध्ये त्यांच्या श्रीमंतीचे किस्सेही बऱ्याच वेळा ऐकले जातात. पण जर कोणी म्हटले की बिल गेट्स हे अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी आहेत, तर बऱ्याच लोकांच्या भुवया उंचावल्या जातील. पण एका रिपोर्ट नुसार हे खरे आहे! बिल गेट्स यांच्या मालकीच्या अमेरिकेच्या 18 राज्यांमध्ये लाखो एकर जमीनी असल्याचे बोलले जात आहे. त्या जमिनीचा वापर शेतीसाठी केला जातो.

अमेरिकेतील अर्कांसास, अरिझोना, कॅलिफोर्निया, कोलाराडो, फ्लोरिडा, इडलेव, इलिनोईस, लोवा, मिशिगन, मिसिसिपी, वॉशिंग्टन, न्यू मेक्सिको, नोर्थ कॅरोलीना आणि अजून काही राज्यांमध्ये मिळून 2 लाख 42 हजार एकर इतकी जमीन बिल गेट्स आणि बिल गेट्स यांच्या मार्फत काही थर्ड पार्टीच्या मालकीची आहे. असे रिपोर्ट मार्फत बोलले जात आहे.

बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मिलिंडा गेट्स यांनी आपण केलेल्या बिल अँड मिलिंडा गेट्स फाउंडेशनमार्फत शेतकऱ्यांना भरपूर मदत केली होती. तसेच ‘क्लायमेट चेंज’साठी अभ्यासाकरिता त्यांनी ‘गेट्स एज वन’ नावाचे एनजीओ सुद्धा स्थापन केली होती. यामधून बिल गेट्स यांचे शेती प्रेम सुद्धा दिसून येते. बिल गेट्स मायक्रोसॉफ्ट’चे संस्थापक असून ते जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.