हेलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकरी खरीप पिकांची काढणी करत आहेत. प्रामुख्याने खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या उडीद (Black Gram), मूग या पिकांची काढणी सुरू आहे. तर काही शेतकरी काढणी केलेला शेतमाल विकण्यासाठी बाजारात आणत आहेत. बाजार समित्यांमध्ये उडीद, मूग या पिकांची आवक सुरु झाली आहे. त्यामध्ये काही पिकांना चांगला तर मिळत आहे.
उडीदाला (Black Gram) मिळतोय चांगला दर
बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरूवारी दि. 19 सप्टेबर रोजी मुख्य यार्ड मध्ये उडीदास (Black Gram) 7752/- रु. प्रति क्विंटल असा उच्चांकी दर मिळाला तर रू. 7251/- रु. प्रति क्विंटल इतका सरासरी दर मिळाला आहे. या बाजार समितीमध्ये 740 क्विंटल उडीदाची आवक झाली.
मुगालाही मिळतोय चांगला भाव
तसेच बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या मुगास रू. 14,100/- प्रति क्विंटल तर हिरव्या मुगास रू. ७२००/- प्रति क्विंटल इतका दर मिळाला.
शेतकऱ्यांनी स्वच्छ व वाळवून शेतमाल आणण्याचे आवाहन
बारामती येथील बाजार समितीमध्ये सध्या पुरंदर, फलटण, बारामती, इंदापुर, दौंड तसेच सोलापुर जिल्ह्यातील काही भागातुन उडदाची आवक होत आहे. त्याच बरोबर गहू, गावरान ज्वारी, बाजरी, मूग व हरभरा या शेतमालाची आवाक होत आहे. काही दिवसात बाजरी व मका या शेतमालाचा काढणी हंगाम सुरू होत असल्याने शेतकऱ्यांनी आपला माल स्वच्छ व वाळवून आणावा, असे आवाहन बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे करण्यात आले आहे.