Boka Saul Rice: अंड्यापेक्षाही जास्त प्रोटीन आहे या तांदळात, न शिजवता खाल्ल्याने मिळतो लाभ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: आज आम्ही तुमच्यासाठी अशा तांदळाची (Boka Saul Rice) माहिती घेऊन आलो आहोत, जे न शिजवता खाल्ल्या जाते आणि यात प्रोटीनचे प्रमाणही कितीतरी जास्त असते. हा भात मुख्यतः आसाममधील (Assam Rice) शेतकरी पिकवतात. मात्र, हा तांदूळ वेगवेगळ्या नावांनीही ओळखला जातो (Boka Saul Rice).

प्रोटीन म्हटलं की आपल्याला सर्वात अगोदर लक्षात येते ते म्हणजे अंडी किंवा चिकन. पण तुम्हाला माहित आहे का की अंड्यांपेक्षा जास्त प्रथिने एका खास प्रकारच्या तांदळात आढळतात, ज्याची लागवड करून शेतकरी त्यांचे उत्पन्न दुप्पट करू शकतात. होय, हे खरे आहे. जर तुम्ही शाकाहारी असाल तर हा भात (Boka Saul Rice) तुमच्यासाठी प्रोटीन मिळवण्यासाठी (High Protein Rice) एक चांगला पर्याय ठरू शकतो.

आम्ही ज्या तांदळाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव ‘बोका शौल’ (Boka Saul Rice) असे आहे. आसामीमध्ये बोका म्हणजे चिखल (आणि त्यातील मऊपणा) आणि शौल म्हणजे तांदूळ. आसाममधील काही जिल्ह्यांमध्ये या भाताला कोमल शौल (Komal Saul) असेही म्हणतात. हा भात न शिजवता खाल्ला जातो (No Cooking Rice). सर्वसामान्य तापमानाच्या पाण्यात 15-30 मिनिटे भिजवून हा तांदूळ खाता येतो त्यामुळे याला मॅजिक राईस (Magic Rice) असेही म्हणतात. जाणून घेऊ या भाताविषयी सविस्तर माहिती.

बोका शौल तांदूळ कसे खातात?

बोका शौल तांदूळ (Boka Saul Rice) खाण्यासाठी प्रथम ते 30 ते 35 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावे आणि नंतर आपल्या चवीनुसार गूळ किंवा दह्यासोबत खाऊ शकता. याशिवाय, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हा भात शिजवून खाऊ शकता, पण या भाताची खरी चव भिजवल्यानंतरच येते.

बोका शौल तांदळातील पोषक घटक  

बोका शौल तांदळात (Boka Saul Rice) प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. त्यात मँगनीज, लोह, सेलेनियम, नियासिन, फोलेट आणि तांबे इत्यादी पोषक घटक असतात. मिळालेल्या माहितीनुसार, बोका शौल मध्ये 6.8 ग्रॅम प्रोटीन आणि 10.73 टक्के फायबर आढळते. याशिवाय, असे मानले जाते की हा भात आपल्या शरीराला आतून थंड ठेवण्यास मदत करतो.

GI टॅग लाभलेला तांदूळ  

बोका शौल तांदूळ हे मुख्यतः आसाम राज्यातील शेतकरी पिकवतात. या तांदळाच्या वैशिष्ट्यामुळे त्याला 2018 मध्ये GI टॅग (GI Rice) देखील देण्यात आला आहे. याशिवाय, हा तांदूळ भारतातील फोर्टिफाइड खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे.

बोका शौल (Boka Saul Rice) विशेषतः उन्हाळ्याच्या महिन्यांत दक्षिण आसाममधील शेतकरी खातात. या तांदळाला न शिजवता खाल्ल्याने गुणवत्तेत भर घालते. या तांदळातील उच्च पोषण आणि उर्जा सामग्री यामुळे आसाममधील गर्भवती महिला हा तांदूळ आवडीने खातात.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.