हॅलो कृषी ऑनलाईन: पावसाळ्याची सुरुवात ही नेहमीच वादळी वारा (Care During Thunder and Lightning) आणि विजेच्या कडकडाटासह असते. अशावेळी वीज पडून शेतकर्यांचे (Farmers) आणि जनावरांचे नुकसान (Livestock Hazards Due To Thunderstorm) होते, बरेचदा मृत्युमुखी (Death Due To Thunderstorm) पडण्याची भीती असते. वीज पडू नये हे जरी आपल्या हातात नसले तरी अशा परिस्थितीत काय काळजी घेता येईल आणि सावधगिरी बाळगता येईल याबद्दल जाणून घेऊ या. कारण भीती आणि अज्ञान या दोन गोष्टी कोणत्याही आपत्तीपासून (Care During Thunder and Lightning) होणारे नुकसान ठरवतात.
कशी खबरदारी घ्यावी? (Care During Thunder and Lightning)
शेतकरी बांधवांनी मेघ गर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने पुढील प्रमाणे काळजी घ्यावी.
- मेघ गर्जना, विजांचा कडकडाट व जोरदार वाऱ्याची शक्यता असल्याने नवीन लागवड केलेल्या फळबागांना तसेच भाजीपाला पिकांना जोरदार वाऱ्यामुळे झाडे पडू नये म्हणून काठी/बांबूच्या सहाय्याने आधार द्यावा.
- शेतामध्ये काम करत असल्यास त्वरित सुरक्षित ठिकाणी जावे. झाडाखाली थांबणे टाळावे.
- जनावरे तलाव, नदी किंवा इतर पाण्याच्या ठिकाणी असतील तर त्यांना त्वरित बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी आणावे (Care During Thunder and Lightning).
- जनावरे ट्रॅक्टर किंवा इतर धातुंच्या वस्तूंपासून लांब बांधावीत.
- वाहने झाडाखाली उभी करू नयेत.
- काढणी केलेला शेतमाल प्लास्टिकच्या कागदाने झाकावा.
- विद्युत उपकरणे, विद्युत तारा यांचा संपर्क टाळावा.
- जनावरांना झाडाखाली जमा होऊ देऊ नये.
मेघगर्जना व विजांचा कडकडाट इ. च्या अंदाजासाठी ‘दामिनी’ अँड्रॉइड अॅप्लिकेशन डाउनलोड करावे व त्याचा वापर करावा.
दामिनी अॅप डाउनलोड करण्यासाठी लिंक: https://play.google.com/store/apps/details?id=com.lightening.live.damini