हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशातील काजू उत्पादक शेतकऱ्यासांठी (Cashew Farming) आनंदाची बातमी असून, काजू उत्पादकांचे कष्ट कमी व्हावेत. यासाठी कृषी अभियंत्यांकडून एका मशिनची निर्मिती करण्यात आली आहे. या मशीनचा उपयोग करून शेतकऱ्यांना, काजू सोलणे सोपे जाणार आहे. सध्या शेतकरी मजूर पद्धतीने काजू सोलत असल्याने, त्यांना मजुरीसह अधिकचा वेळही द्यावा लागतो. मात्र आता कृषी अभियंत्यांनी तयार केलेल्या या मशीनचा वापर करून शेतकऱ्यांना काजू सोलणे (Cashew Farming) सोपे जाणार आहे.
शेतकऱ्यांचे काम झाले सोपे (Cashew Farming Peeling Nuts Made Easy)
महाराष्ट्र हे केरळ या राज्यानंतर दुसरे सर्वाधिक काजू उत्पादक राज्य आहे. राज्यात सध्या काजू उत्पादक शेतकरी (Cashew Farming) पारंपरीक पद्धतीने काजू सोलतात. ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक खर्चासह अधिकचा वेळ द्यावा लागतो. मात्र कृषी अभियंत्यांकडून तयार करण्यात आलेल्या या मशीनच्या मदतीने शेतकऱ्यांना कमी वेळात अधिक काजू सोलणे शक्य होणार आहे. याशिवाय या मशीनने काजूची सोलताना कोणतीही फूटतूट होत नाही. गोवा राज्यातील बिट्स पिलानी अर्थात बिर्ला इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील कृषी अभियंत्यांकडून ही काजू सोलण्याची मशीन तयार करण्यात आली आहे.
नुकसान कमी होणार
बिर्ला इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीचे कृषी संचालक नेविल अल्फांसो यांनी या मशीनबाबत बोलताना म्हटले आहे की, “बिट्स पिलानीकडून विकसित करण्यात आलेल्या या तंत्रज्ञानामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शेतकरी मजूर लावून काजू सोलतात त्यामुळे काजूची मोठ्या प्रमाणात फूटतूट होते. देशात दरवर्षी सोलण्याच्या प्रक्रियेत अशी हजारो टन काजूची नासाडी होते. मात्र आता बिट्स पिलानी इन्स्टिटयूटने तयार केलेल्या या मशिनमुळे शेतकऱ्यांचे होणारे हे नुकसान पूर्णपणे थांबणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांचा मजुरीवरील खर्च देखील कमी होणार आहे. इतकेच नाही तर काजू सोलल्यानंतर मागे राहणाऱ्या अवशेषणांपासून जैविक खत निर्मितीबाबतच्या कल्पनेवरही इन्स्टिटयूटकडून काम सुरु आहे”
देशातील अनेक राज्यांमध्ये काजूचे उत्पादन घेतले जाते. जगातील एकूण काजू उत्पादनात भारताचा वाटा 23 टक्के इतका आहे. देशातील केरळ या राज्यात सार्वधिक काजू उत्पादन होते. तर महाराष्ट्र हे राज्य काजू उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशातील 28.09 काजू उत्पादन केरळ या राज्यात तर 20.31 टक्के काजू उत्पादन महाराष्ट्रात होते. याशिवाय ओडिसा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्येही मोठ्या प्रमाणात काजू उत्पादन घेतले जाते.