हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने मराठवाडा आणि विदर्भात उन्हाचा चटका वाढला आहे. कोकण पश्चिम महाराष्ट्रात अंशतः ढगाळ वातावरण आहे. येथे काही दिवस राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू राहणार आहे. तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे.
मान्सूनचा मोर्चा उत्तरेकडे
उत्तर भारतात मान्सूनचा आज अमृतसर कुरुक्षेत्र, गोरखपुर, मुज्जाफरपूर, जालपैगुडी आणि पश्चिम भाग ते अरुणाचल प्रदेशापर्यंत कार्यरत आहे. राजस्थानच्या आग्नेय या भागातही चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून 3.1 किलोमीटर आणि 4.5 किलो मीटर उंचीवर आहे. पश्चिम उत्तर प्रदेश व परिसरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती बिहार व परिसर पश्चिम उत्तर प्रदेश या भागापर्यंत असून समुद्रसपाटीपासून 4.5 किलो मीटर उंचीवर आहे.
विदर्भ मराठवाड्यात उन्हाचा चटका
सध्या पावसासाठी पोषक वातावरण नसल्यामुळे कमाल तापमानाचा पारा वाढत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे मंगळवारी दिनांक दहा रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत अकोला येथे सर्वाधिक 35. ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर जळगाव, सोलापूर, परभणी, बीड, अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा मध्ये तापमान 34 ते 35 अंशांच्या दरम्यान आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ झाली असून उकाड्यात हे वाढ झाली आहे.
11 Aug, #Mumbai #Thane Parts of #Raigad cloudy sky, light to mod rains being reported
Mumbai more towards suburbs pic.twitter.com/4FglmDbgPq— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 11, 2021
मुंबई, ठाणे, रायगड , घाटमाथ्यावर ढगाळ वातावरण
हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई ठाणे आणि रायगड च्या काही भागावर ढगाळ वातावरण तयार झाले आहे. राज्यातील काही भागांच्या घाटमाथ्यावर देखील ढग जमा झाल्याची माहिती वेळेस होसाळीकर यांनी ट्विटर अकाउंट वरून दिली आहे.
Latest satellite obs at 11.30 am indicates the scattered isolated clouds especially over ghat areas of Maharashtra and adjoining areas. pic.twitter.com/cB1oQPbowp
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 11, 2021