कापुस उत्पादक शेतकरी मित्रांनो रस शोषण करणाऱ्या किडींचे असे करा व्यवस्थापन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. खरिपातील सोयाबीनसह सर्वच पिकांची वाढ होत असुन बहुतांश पिके फुल अवस्थेत आहेत. खरीपातील कपाशी वाढीच्या अवस्थेत असून कपाशी काही ठिकाणी पाते व फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. एकीकडे पावसाने ओढ दिली असताना सतत ढगाळ वातावरण असल्यामुळे कपाशीवर मोठ्या प्रमाणात मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे .त्यासोबतच काही प्रमाणात तुडतुडे सुद्धा दिसून येत आहेत. माव्यामुळे कपाशीच्या वाढीवर परिणाम होताना दिसून येत आहे. तसेच उशिरा लागवड केलेल्या कपाशी दोन ते चार पानावर आहेत. त्यावर मावा किडीमुळे फार मोठा परिणाम होऊन त्या ठिकाणी कपाशीची वाढ खुंटते.म्हणून मावा किडीचे वेळीच व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. या परिस्थितीत करायच्या व्यवस्थापनां संदर्भात वनामकृवि कडून पिक सल्ला देण्यात आला असून पाहुयात काय उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत .

व्यवस्थापन 

–मावा किडीचा प्रसार शेतामध्ये मुंगळ्यांद्वारे केला जातो त्यामुळे कपाशीचा शेताच्या आजूबाजूला असलेले मुंगळ्याची वारुळे नष्ट करावीत जेणेकरून मावा किडीचा प्रसार कमी होईल .

–रसशोषक किडीच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा व्हर्टिसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) १ कि.ग्रॅम किंवा फ्लोनिकॅमिड ५० टक्के ६० ग्रॅम किंवा डायनेटोफ्युरॉन २० टक्के ६० ग्रॅम किंवा बुप्रोफेझीन २५ टक्के ४०० मिली किंवा असिटामाप्रीड २० टक्के ४० ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी.

–वरील प्रमाण सर्व प्रकारच्या पंपाकरिता आहे असुनसदरील कीटकनाशकासोबत कुठलेही इतर कीटकनाशक, बुरशीनाशक, खते, संप्रेरक मिसळून फवारणी करु नये असा ही सला वनामकृवि कडून देण्यात आला आहे .

अधिक माहितीसाठी संपर्क करा
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
परभणी
०२४५२-२२९०००

Leave a Comment

error: Content is protected !!