Cotton Rate : कापूस बाजारभाव 9 हजारांवर जाणार? जाणून घ्या आजचे अपडेट्स

Kapus bajarbhav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Cotton rate) : कापसाला यंदा बऱ्यापैकी मागणी दिसते. सध्या बाजारात कापूस हा आठ हजारांहून अधिक बाजारभावात विकला जातोय. याचा परिणाम हा कापूस विक्रेत्यांवर होतो. मात्र सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे बाजारभावातील दरात बरीचशी तफावत पहायला मिळत आहे.

सध्याच्या सुरू असलेल्या हंगामात कापूस या पिकाला अधिक मागणी आहे. लग्नसराई तसेच इतर कार्यक्रमांमुळे कापसाच्या बाजारभावाला चांगले उत्पन्न पहायला मिळत होतं. मात्र आता अवकाळी पावसामुळे हे सर्व चित्र पालटलं आहे. याचा तोटा कापूस विक्रेते आणि शेतकऱ्यांना होतोय. येत्या १४ एप्रिलपासून अवकाळी पाऊस असणार आहे. यामुळे येत्या काही दिवसात कापसाच्या बाजारभावाबद्दल भाष्य करणं थोडसं अवघड असेल. अशाच आजच्या दिवसातील बाजारभावाचे दर जाणून घ्यायचे असतील तर खालील तक्त्यात कापसाचे बाजारभाव नमूद करण्यात आले आहेत. तसेच कापसाच्या बाजारभावाचे रोजचे दर जाणून घ्यायचे असतील तर Hello krushi हे ॲप डाऊनलोड करा.

घरबसल्या मिळवा पिकांचे बाजारभाव अपडेट

Hello Krushi हे ॲप अजूनही डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. यासाठी सर्वात आधी हिरव्या रंगाचे Hello krushi ॲप डाऊनलोड करा. गूगल प्ले स्टोअरवर जाऊन ॲप सर्च करून इंस्टॉल करा. त्यानंतर आपल्याला हव्या त्या बाजारभावाची माहिती मिळू शकते. सातबारा, नकाशा, जमीन मोजणी, हवामान अंदाज, शेतकरी दुकान या सुविधा आता एका क्लिकवर अपद्वरे मिळू शकता.

कापसाच्या आजच्या बाजारभावाची थोडक्यात रुपरेषा

हिंगणा बाजारसमितीत प्रतिक्विंटल आवक आणि बाजारभावाचा विचार केल्यास सर्वात कमी प्रतिक्विंटल आवक ही २४ आहे. तसेच राज्यातील सर्वाधिक प्रतिक्विंटल कापूस दर हे सिंदी (सेलू) बजारसमितीत ८ हजार ३०० दरापर्यंत आहे. तसेच मनवत बाजारसमितीत या कापसाचे राज्यातील सर्वात कमी दर हे ६ हजार सातशे पर्यंत आहे. मात्र याच बाजारसमितीत कापसाची प्रतिक्विंटल आवक ही सर्वात अधिक ७ हजार चारशे दहा एवढी आहे. आजच्या दिवसातील बाजारभावाचे दर जाणून घ्यायचे असतील तर खालील तक्त्यात कापसाचे बाजारभाव नमूद करण्यात आले आहेत.