हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो हंगामातील कापूस हे एकमेव पीक असे आहे ज्याला सर्वाधिक दर मिळाला आहे. बाजार समिती मधला कापसाचा रुबाब आताही कायम आहे. काही दिवसांपूर्वी कापसाला विक्रमी 13 हजार रुपयांचा भाव मिळाला होता मात्र आता तो ही रेकॉर्ड ब्रेक करत आज कापसाला कमाल भाव 14370 रुपये मिळाला आहे.
आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार सिंधी सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लांब स्टेपल कापसाला 14370 एवढा कमाल भाव मिळाला आहे. आज या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चारशे वीस क्विंटल कापसाची आवक झाली याकरिता किमान भाव 9500 कमाल भाव 14370 आणि सर्वसाधारण भाव 13 हजार 560 रुपये मिळाला आहे.
उच्च दराचा शेतकऱ्याला फायदा नाहीच
अद्यापही कापड उद्योगाकडून कापसाला मागणी आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामात देखील कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात होईल असा अंदाज वर्तवला जातो आहे. मात्र सध्याच्या कापसाबद्दल बोलायचं झाल्यास बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाला दहा हजार रुपये भाव मिळाल्यानंतर हा कापूस विक्री केला आहे. त्यामुळे आता फार कमी शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे. त्यामुळे त्याचा लाभ हा त्याच शेतकऱ्यांना होतो आहे ज्यांच्याकडे कापूस शिल्लक आहे. त्यातही चांगल्या प्रतीच्या लांब स्टेपल कापसाला हा दर मिळतो आहे. त्यामुळे दर जरी चांगला असला तरी सर्वच शेतकऱ्यांना याचा फायदा होतो असे नाही.
(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )
आजचे कापूस बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
17/05/2022 | ||||||
आर्वी | एच-४ – मध्यम स्टेपल | क्विंटल | 70 | 10000 | 13400 | 11000 |
सिंदी(सेलू) | लांब स्टेपल | क्विंटल | 420 | 9500 | 14370 | 13560 |
यावल | मध्यम स्टेपल | क्विंटल | 40 | 8170 | 9830 | 9410 |
16/05/2022 | ||||||
सावनेर | — | क्विंटल | 1900 | 11000 | 12000 | 11500 |
समुद्रपूर | — | क्विंटल | 16 | 10500 | 10500 | 10500 |
आर्वी | एच-४ – मध्यम स्टेपल | क्विंटल | 62 | 10000 | 13400 | 11500 |
कळमेश्वर | हायब्रीड | क्विंटल | 12 | 9000 | 11500 | 10000 |
15/05/2022 | ||||||
आर्वी | एच-४ – मध्यम स्टेपल | क्विंटल | 57 | 10000 | 13100 | 11500 |
14/05/2022 | ||||||
सावनेर | — | क्विंटल | 1300 | 11000 | 11800 | 11500 |
समुद्रपूर | — | क्विंटल | 30 | 8500 | 10300 | 9800 |
आर्वी | एच-४ – मध्यम स्टेपल | क्विंटल | 85 | 10000 | 12800 | 11000 |
जामनेर | हायब्रीड | क्विंटल | 37 | 10500 | 11300 | 10900 |
कळमेश्वर | हायब्रीड | क्विंटल | 8 | 9000 | 11500 | 10000 |
सिंदी(सेलू) | लांब स्टेपल | क्विंटल | 350 | 9080 | 14465 | 13230 |