हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात यावर्षी पावसामुळे वेगवेगळ्या पिकाचे (Crop Damage Due To Rain) भारी प्रमाणात नुकसान झाले आहे. जुलै महिन्यात (July Month) झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील (Pune District) सुमारे 1 हजार 74 हेक्टरवरील पिके व फळबागा बाधित झालेल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यात 33 टक्क्यांपेक्षा पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. आतापर्यंत सुमारे 3 हजार 948 शेतकऱ्यांचे (Farmers) पावसामुळे (Crop Damage Due To Rain) नुकसान झाले आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी काचोळे यांनी पीक नुकसानीपोटी संबंधित शेतकर्यांना 2 कोटी 4 लाख 1 हजार 279 रुपया इतकी मदत मिळणे अपेक्षित असल्याची माहिती दिली आहे.
कृषी विभागाने (Agriculture Department) जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेती आणि फळपिकांच्या नुकसानीचा (Crop Damage Due To Rain) ताजा अहवाल तयार केलेला आहे.
त्यामध्ये जिरायत पिकांचे व बागायत पिकांचे अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अहवालानुसार फळपिके सोडून जिरायत पिकांखालील 2 हजार 769 शेतकर्यांचे 655.48 हेक्टर, फळपिके सोडून बागायत पिकांखालील 1 हजार 129 शेतकर्यांचे 403.74 हेक्टर आणि फळपिकांखालील बाधित क्षेत्राच्या 50 शेतकर्यांचे 15.08 हेक्टर मिळून एकूण 3 हजार 948 शेतकर्यांचे 1 हजार 74 हेक्टर वरील पिके बाधित (Crop Damage Due To Rain) झाल्याचेही काचोळे यांनी स्पष्ट केले.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सुद्धा राज्यात चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. विशेषतः सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. राज्यात वेगवेगळ्या भागात पिकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकर्यांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.