पपई पिकावरील रोग आणि त्यावरील सोपे उपचार

papaya
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : फळबागांचा विचार करता पपई हे शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळवून देणारं ठरतं पपईची लागवड देशभरात सर्वत्र केली जाते कोणत्याही प्रकारच्या मातीत पपईची बाग लावणं शक्य असतं कमी पाण्यावर हे पीक घेता येतं एकंदर गुंतवणूकही कमी लागत असताना फायदा अधिक होतं मात्र पपईची लागवड करायची असेल तर पिकाची देखभाल वारंवार करावे लागते पपईचे फळ चविष्ट असून त्यात अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे योग्य बाजारपेठ शोधल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. आजच्या लेखात पपईवर पडणारे रोग आणि त्यावर सेंद्रिय पद्धतीने केलेले उपाय याबाबतची माहिती घेऊयात…

माहू : रोपांमधील रस शोषून हा रोग फळ कमकुवत बनवतो फळांना या रोगापासून वाचवण्यासाठी कडू लिंबाचा काढा किंवा गोमूत्राचा शिंपण करणं फायदेशीर ठरतं.

लाल कोळी : लाल कोळी ही कीड पपईच्या पिकावर पडू शकते. ती पानांमधील रस शोषून रोपांना कमकुवत बनते या किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास कीड फळांमधील रस शोषून लागते. या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी ही कडुनिंबाचा काढा किंवा गोमूत्रात शिंपण फायदेशीर ठरतं.

कालर राट : कालर राट नावाचा रोग पिथीयम इफेनिदर्मेटम नावाच्या बुरशीमुळे पिकावर पडतो. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे जमिनीपासून जवळ खोडावर डाग पडू लागतात आणि खोड सडू लागते. काही दिवसानंतर झाड कोसळून पडते. या रोगापासून बचावासाठी एरंडाचे तेल तसेच कडुनिंबाचे खत देणे उपयुक्त ठरते. याशिवाय गोमूत्र आणि कडुनिंबाच्या काढण्याचाही चांगला उपयोग होतो.

आरद्रगलन : या नावाचा रोग रोपवाटिकेत रोपे असतानाच होऊ शकतो. हा एक गंभीर बुरशीजन्य आजार असून या आरोपामुळे जमिनीलगतच रोप कुजण्यास सुरुवात होते आणि नंतर रोप माना टाकतात. या रोगाच्या नायनाटासाठी केरोसिन, तेल, गोमूत्र, कडुनिंबाचे तेल आणि कढ्याचा वापर करून रोपं उपचारित केली जातात. मगच त्याचे रोपण करण्यात येते. रोपवाटिकेच्या मातीत कडुनिंबाचे खत आणि एरंडाचे तेल मिसळून मगच रोपे तयार केल्यास हा रोग होत नाही.

मॉजेक : हा एक विषाणूजन्य रोग असून पपईच्या भारतातील जवळजवळ सर्व प्रजातींवर तो रोग पडू शकतो. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पाने निस्तेज आणि देठही लहान होतात. परिणामी फळे कमी लागतात. या रोगाच्या नायनाटासाठी कडुनिंबाचा काढा आणि गोमुत्राचा शिडकावा 10 ते 15 दिवसांच्या अंतराने केल्या जातो.

काढा आणि गोमुत्राचा वापर करण्याचे तंत्र

कडुनिंबाचा काढा: हा काढा बनवण्यासाठी कडुनिंबाची 25 हिरवी आणि ताजी पानं तोडून ती वाटली जातात नंतर ते पन्नास लिटर उकळत्या पाण्यात उकळून घेतले जातात जेव्हा पाणी कमी होऊन वीस ते पंचवीस लिटर उरते तेव्हा पातेलं आचेवरून उतरवून थंड काढा केला जातो अशा प्रकारे तयार केलेला काढा गरजेप्रमाणे रोपांवर आणि झाडांवर शिंपडला जातो.

गोमूत्र : देशी गायीचे दहा लिटर मूत्र पारदर्शक अशा काचेच्या किंवा प्लास्टिकच्या जारमध्ये भरून पंधरा ते दहा दिवस उन्हात ठेवले जाते त्यानंतर गरजेप्रमाणे ते रोपांवर किंवा झाडांवर शिंपडले जाते.