हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात विविध भागांमध्ये आवडीनुसार वांग्याच्या विविध जाती आहेत.सांगली, सातारा भागात कृष्णाकाठची वांगी प्रसिद्ध आहेत.अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याचा विचार केला तर या भागांमध्ये काटेरी किंवा डोरली वांगी जास्त पसंत केली जातात. वांगी हे नगदी पीक आहे. परंतु महत्त्वपूर्ण अशा या पिकावर कीड आणि रोगांचे नियंत्रण करणे फार महत्त्वाचे असते. या लेखाचा पण वांगी पिकावरील महत्वाचे कीड व त्यांच्या नियंत्रणासाठी करायचे उपाय याबद्दल माहिती घेऊया…
१) वांग्यावरील लाल कोळी च्या नियंत्रणासाठी उपाय
पाच टक्के निंबोळी पावडर अर्काची फवारणी नियंत्रित करावी. 20 ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे. माती परीक्षणानुसार खते द्यावीत.
२) वांग्यावरील फळ पोखरणारी अळीचे नियंत्रण
या किडीमुळे वांगी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तिखट पांढऱ्या रंगाच्या या शेंड्यातून खोडात शिरून आतील भाग पोखरून खातात आणि त्यामुळे झाडाची शेंडे वाढूनझाडाची वाढ खुंटते. फळे लहान असतांना अळी देठाजवळुन फळात शिरुन फळाचे नुकसान करते.
या अळी चे नियंत्रण
1-आळी ग्रस्त शेंडे काढून टाकावेत.
फवारणीसाठी क्लोरोपायरीफॉस 17 मिलीप्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. त्यानंतर निंबोळी अर्क 5% ची ( निंबोळी पावडर पाच किलो प्रति 100 लिटर पाणी याप्रमाणे भिजवून अर्क काढून घ्यावा ) फवारणी करावी. त्यानंतर डेमीथोयेट15 मिली +नुवान आठ मिलीप्रति दहा लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. त्यानंतर निंबोळी अर्काची फवारणी घ्यावी.
–सूक्ष्म अन्नद्रव्ये दोन लिटर प्रति 300 लिटर पाणी याप्रमाणे 20 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
–डीएपी 0.5 टक्के व 13:0:45 हे खत 0.5 टक्के च्या आठ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
–जमिनीतून झिंक सल्फेट फेरस सल्फेट, मॅग्नीज सल्फेट दहा किलो प्रत्येकी व बोरॅक्स दोन किलो प्रती एकर याप्रमाणे शेणखताबरोबर द्यावे.
–लैगिक गंध सापळे पाच प्रति अर्धा एकर प्रमाणे लावावेत. त्यातील गोळी दर पंधरा दिवसांनी बदलावी.
–प्रकाश सापळे एक प्रति अर्धा एकर क्षेत्रात लावावा.
–जिवाणू खते अझोटोबॅक्टर दोन किलो+ पीएसबी दोन किलो + शेणखत मिसळून जमिनीतून द्यावे.