Electric Shock : पावसाळ्यात मोटार चालू-बंद करताना काय काळजी घ्यावी? विजेचा शॉक लागला तर सर्वात अगोदर काय करावं? जाणून घ्या

Electric Shock
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Electric Shock : शेतकऱ्यांना दिवसा तसेच रात्री-अपरात्री पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत मोटार चालू अथवा बंद करावी लागते. पावसाळ्यामध्ये काही वेळा पॅनल बॉक्समध्ये विद्युत प्रवाह उतरतो, अशा वेळी पॅनल बॉक्सला हात लावल्यास दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्याच्या दिवसांत विद्युत शॉक लागून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्याच्या आपण पाहतो. परंतु आपण स्वतः योग्य काळजी घेतली तर असे अपघात कमी करता येऊ शकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात पॅनल बॉक्स हाताळताना काय काळजी घ्यावी याबद्दल अतिशय महत्वाची माहिती सांगणार आहोत.

तुमच्या गावाच्या जवळील वायरमन कसा शोधाल?

शेतकरी मित्रांनो आपल्याला नेहमीच एक वायरमन माहिती असतो. परंतु एखाद्यादिवशी आपले अर्जंट काम असते अन आपला नेहमीच वायरमन सुट्टीवर असतो तेव्हा मोठी अडचण निर्माण होते. मात्र आता तुम्हाला तुमच्या गावाजवळील सर्व वायरमन, प्लम्बर, जनावरांचे डॉक्टर, मजूर यांच्याशी एका क्लिकवर संपर्क करता येणार आहे. यासाठी Hello Krushi नावाचे एक स्पेशन मोबाईल अँप तयार करण्यात आले आहे. यावर सातबारा डाउनलोड करणे, जमीन मोजणे, शासकीय योजनांना अर्ज करणे, रोजचे बाजारभाव आदी सेवाही मोफत देण्यात येतात. तेव्हा तुमच्याकडे हॅलो कृषी नसेल तर आजच गुगल प्ले स्टोअर ओपन करून Hello Krushi असं सर्च करा आणि हॅलो कृषी अँप डाउनलोड करून घ्या.

काय काळजी घ्यावी?

  • शेतकऱ्यांनी प्रत्येक वेळी मोटार चालू-बंद करताना पॅनेल बोर्डला टेस्टर लावून टेस्टरच्या साह्याने आधी तपासून घ्यावे. हात लावून विजेचा प्रवाह तपासू नये. त्यासाठी टेस्टरचा वापर करावा. टेस्टरमध्ये लाईट लागल्यास पॅनल बोर्डला हात लावू नये. कारण अनेकवेळा पॅनेल बोर्डमध्ये असणाऱ्या वायर उंदीर कुरतडतात. त्यामुळे आतील तारेचा स्पर्श पॅनल बोर्डला झाल्यास विजेचा शॉक लागण्याचा धोका निर्माण होतो. पॅनेल बोर्ड हाताळताना रबराचे हातमोजे वापरावे. पॅनेल बोर्डमधील वायर वारंवार तपासून घ्याव्यात, वायर तपासताना काळजी घ्यावी.
  • पावसाळ्यात पॅनलबोर्ड हाताळताना नेहमी रबराचे गमबूट वापरणे गरजेचे आहे.
  • अर्थिंगचे कनेक्शन नेहमी सुस्थितीत ठेवणे महत्त्वाचे आहे. कारण सुरक्षितता ही चांगल्या अर्थिंगच्या कनेक्शनवर अवलंबून असते.
  • विजेवर चालणारे उपकरण दुरुस्त करायचे असल्यास आधी मेन स्वीच बंद करावा. मेन स्विच बंद केल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला दुरुस्ती करावयाची तेथे टेस्टरने लाइन तपासून घ्यावी, कारण पुष्कळ वेळा यांत्रिक दोषामुळे मेन- स्विच आतून बंद होत नाहीत.

विजेचा शॉक लागला तर काय कराल ?

  • विजेचा शॉक लागलेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी पुढे सरसावताना आजुबाजूला अवश्य पहा. आसपास लोखंडाचा तुकडा, पाणी यासारखी विद्युत प्रवाह करणार्‍या वस्तू नाहीत. याची खात्री करावी.
  • तात्काळ इमरजन्सी हेल्पलाईनला मदत करा.
  • ज्यामुळे शॉक लागतोय त्या वस्तूपासून व्यक्तीला तात्काळ दूर करा. पॉवर बटण बंद करा. ज्यामधून विद्युत प्रवाह वाहत नाही अशा वस्तूंचा वापर करून संबंधित व्यक्तीला मदत करा.
  • यासाठी लाकडाचा टेबल, लाकडी काठी वापरा. शॉक लागलेल्या व्यक्तीला थेट हात लावू नका. यामुळे मदत करणार्‍यालाही शॉक लागू शकतो. विजेचा शॉक लागलेल्या व्यक्तीला बाजूला केल्यानंतर रिकव्हरी पोजिशनमध्ये ठेवा. याकरिता त्या व्यक्तीला एका कुशीवर ठेवा. हाताने डोक्याला आधार द्या, गुडघे दुमडून हनुवटी वरच्या बाजूला ठेवा. यामुळे व्यक्तीचा श्वासोश्वास चालू आहे. याची खात्री करून घ्या.
  • शॉक लागलेल्या व्यक्तीचा श्वास चालू असल्यास आणि लहानशी जखम झाली असल्यास वाहत्या पाण्याखाली ते धुवा. श्वासोच्छवास आणि हृदय बंद पडले असल्यास त्वरित कृत्रिम श्वासोच्छवासाचा प्राथमिक उपचार सुरू करावा. हे काम कोणताही सर्वसामान्य माणूसही करू शकतो आणि डॉक्टर येईपर्यंत त्याला पर्यायही नसतो. जखम असताना त्यांना ब्लॅंकेटमध्ये गुंडाळू नका. लवकरात लवकर नजिकच्या दवाखान्यात न्यावे.
  • परंतु विजेचा शॉक बसुच नये, यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.
Rahul Bhise
Bsc ऍग्रीचे शिक्षण पूर्ण झालेले असून शेती क्षेत्रात वार्तांकन करण्यामध्ये विशेष आवड. यशस्वी शेतकऱ्यांच्या कथा, शासकीय योजना, शेती प्रश्न आदी विषयांवर लिखाण करण्यात रस.