हॅलो कृषी ऑनलाईन: आज आम्ही तुम्हाला अशा 3 विदेशी जातींच्या शेळ्यांची (Exotic Goat Breeds) माहिती देणार आहोत ज्यांची प्रति दिवस दूध उत्पादन क्षमता स्थानिक गायीएवढे आहे. या जातीच्या शेळ्यांचे पालनपोषण करून पशुपालक चांगले पैसे कमवू शकतात, कारण या जातीच्या शेळ्यांच्या (Goat Breeds) दुधाला आणि तुपाला बाजारात जास्त मागणी आहे.
भारतात शेळीपालन (Goat Farming) अतिशय वेगाने वाढणारा कृषिपूरक व्यवसाय आहे. या व्यवसायातून दूध, खत आणि इतर कृषी उत्पादने मिळतात. परंतु शेळीपालनात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे, कारण त्यांना शेळ्यांच्या चांगल्या जातींची योग्य माहिती नसते. आज आम्ही तुम्हाला विदेशी शेळ्यांच्या जातीची (Exotic Goat Breeds) माहिती देणार आहोत ज्या चांगले दूध उत्पादन देतात.
अँग्लो न्यूबियन शेळी (Anglo-Nubian Goat)
शेळीपालनातून चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी तुम्ही अँग्लो न्युबियन जातीची शेळी (Exotic Goat Breeds) पाळू शकता. ही एक परदेशी जात आहे, जी युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर पाळली जाते. शेळीची ही जात उच्च दूध उत्पादन आणि मांसासाठी ओळखली जाते. अँग्लो न्युबियन शेळी एका दिवसात सुमारे 5 लिटर दूध देऊ शकते. या जातीच्या शेळ्या खूप उंच असून त्यांचे वजनही झपाट्याने वाढते. अँग्लो न्युबियन शेळ्यांचे संगोपन करून शेतकरी दूध आणि मांस विकून कमी वेळात भरपूर कमाई करू शकतात.
सानेन शेळी (Saanen Goat)
स्वित्झर्लंडमध्ये पाळण्यात येणाऱ्या सानेन शेळीची जात (Exotic Goat Breeds) दुग्ध उत्पादनासाठी खूप लोकप्रिय आहे. ही शेळी इतर जातीच्या शेळ्यांच्या तुलनेत भरपूर दूध देते. सानेन शेळी एका दिवसात सुमारे 4 लिटर दूध देऊ शकते. या जातीच्या शेळ्यांचे मांसही उच्च दर्जाचे असते. बाजारात त्याच्या मांसाला चांगली मागणी आहे, त्यामुळे त्याचे दरही चढेच आहेत. या जातीच्या शेळ्या जन्मानंतर 9 महिन्यांनंतरच गर्भधारणेसाठी तयार होतात.
टोगेनबर्ग शेळी (Toggenburg Goat)
टोगेनबर्ग शेळी देखील स्वित्झर्लंडमध्ये पाळल्या जाणाऱ्या जातींपैकी (Exotic Goat Breeds) एक आहे. या शेळीचे वैशिष्ट्य म्हणजे तिला शिंग नसतात. टोगेनबर्ग शेळी एका दिवसात 4 ते 4.5 लिटर दूध देते. या जातीच्या शेळ्या खूप सुंदर दिसतात, म्हणून बहुतेक लोक त्यांना त्यांच्या घरात पाळीव प्राणी म्हणून ठेवतात. टोगेनबर्ग शेळीचा रंग तपकिरी आणि पांढरा आहे.