हॅलो कृषी ऑनलाईन : प्रत्येक पिकाला नत्र , स्फुरद व पालाश या मुख्य तीन मुलद्रव्यांसह कॅल्सीयम ,मॅग्नीशिअम व गंधक या दुय्यम अन्न घटक व सुक्ष्म मुलद्रव्यांची निरोगी , जोमदार पीकवाढ व भरघोस उत्पादन घेण्यासाठी आवश्यकता असते .बऱ्याचदा आपल्याला पिकातील अन्नद्रव्याची कमतरता लक्षात येत नाही. त्यामुळे शेती उत्पादनात मोठी घट होते . प्रत्येक पिकाच्या पानांमध्ये दिसणाऱ्या बदलांमधून पिकातील झाडांमध्ये कोणत्या मूलद्रव्याची कमतरता आहे हे सहज लक्षात येतं . त्यासाठी खालील माहिती तुम्हाला उपयोगी ठरणार आहे .
नत्र – झाडाची खालची पाने पिवळी होतात, मुळांची व झाडांची वाढ थांबते,
फूट व फळे कमी येतात.
स्फुरद – पाने हिरवट लांबट होऊन वाढ खुंटते, पानाची मागची बाजू जांभळट होते.
पालाश -पानाच्या कडा तांबडसर होऊन पानांवर तांबडे व पिवळे ठिपके पडतात.
खोड आखूड होऊन शेंडे गळून पडतात.
जस्त – पानांचे आकारमान कमी होते. पानांतील शिरांमधील भाग पिवळा पडतो.
पिकांची वाढ खुंटते. पिकांमध्ये पेरे लहान पडतात.
लोह -शेंड्याकडील पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो, झाडांची वाढ
खुंटते.
तांबे – पिकांच्या शेंड्याची वाढ खुंटते व पाने लगेच गळून पडतात. तसेच पाने अरुंद
वाटतात. पानांचे टोक व कडा फिक्कट पिवळ्या दिसतात.
बोरॉन – टोकांवरील नवीन पालवीचा रंग देठाकडून फिक्कट होऊ लागतो. नवीन
पाने मरतात. पानांना सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात. पिकांच्या शेंड्याकडील पाने
मरतात.
मॉलिब्डेनम –
पाने फिक्कट हिरवी पडतात. तपकिरी ठिपके पानांवर दिसतात.
पानांच्या खालच्या भागातून तपकिरी डिंकासारखे द्रव्य स्रवते
गंधक – झाडाच्या पानांचा मूळचा हिरवा रंग कमी होतो, नंतर पाने पूर्ण पिवळी-पांढरी पडतात .