बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांचाही सहभाग ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Eknath shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शिंदे – फडणवीस सरकारने आज खूप महत्वाचे असे निर्णय घेतले आहेत. यात इंधन दरात कपातीपासून अनेक निर्णयांचा समावेश आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भात निर्णय घेत असताना कृषी उत्पन्न देखील महत्वाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. ही घोषणा करीत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षांच्या निवडीमध्ये आता शेतकऱ्यांचाही सहभाग राहणार असल्याचे सांगितले आहे.

शेतकऱ्यांचा सहभाग वाढणार

या निर्णयामुळे त्यामुळे विविध कार्यकारी सोसायटी आणि ग्रामपंचायत सदस्यांपूरती मर्यादित असलेली ही निवडणुक आता व्यापक होणार आहे. त्यामुळे निवडणुकीचे चित्र तर बदलणार आहे पण राज्य सरकार यामागचा उद्देश साध्य करणार का हे देखील पहावे लागणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा सहभाग तर वाढणार आहेच पण मिनी विधानसभेप्रमाणे ही निवडणुक प्रक्रिया आता होणार आहे.

मिनी विधानसभेनुसार असणार निवडणूक

बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये ज्याचे नावे सातबारा उतारा आहे अशा प्रत्येक शेतकऱ्याला सहभाग घेता येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्व करणारा हा जनतेमधून निवडूण आलेला असणे गरजेचे आहे. यावर राज्य सरकराने आता शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे एखाद्या मिनी विधानसभेनुसार हा निवडणुक पार पडणार आहे.