हॅलो कृषी ऑनलाईन: शेतीची आणि मातीची ओढ (Farmers Success Story) लांब असणाऱ्या लोकांना सुद्धा खेचून गावाकडे आणते. असचं काहीतरी झाले आहे दोघा मित्रांच्या बाबतीत. उच्च शिक्षण घेऊन परदेशात चांगल्या पदावर नोकरी करून दोन जीवाभावाच्या मित्रांनी आपल्या लाल मातीशी असलेली बांधिलकी घट्ट जपली आहे (Farmers Success Story).
मुजम्मील अब्दुल करीम सावंत व केतन रविकांत सावंत या दोघांची घट्ट मैत्री आहे. दोघेही उच्चशिक्षित असून आखाती प्रदेशात (Dubai) 17 वर्ष मल्टीनॅशनल कंपनीतील उच्च पदावरील नोकरीवर होते.
परंतु गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्यांनी मायभूमीत बागायती शेती (Irrigated Farming) करायचे ठरविले (Farmers Success Story).
आखाती देशात पाणी विकत घ्यावे लागते, याचा चांगलाच अनुभव त्यांना आलेला होता. त्यांच्या लक्षात आले की आपल्या राज्यात विशेषतः कोकणात भरपूर पाऊस पडतो. या पावसाचे पाणी जर शेतात जिरवले (Rainwater Harvesting) तर कितीतरी पाण्याचे प्रश्न सुटतील असे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पाणी जिरवणे, शेततळे इत्यादी गोष्टींना प्राधान्य दिले (Farmers Success Story).
या दोन मित्रांनी रत्नागिरी (Ratnagiri) तालुक्यातील गोळप येथे दहा एकर जागा घेतली. त्यामध्ये त्यांनी 400 हापूस, 100 काजू, 275 सागांची लागवड केली आहे (Profitable Farming).
शेतीला जोड म्हणून कुक्कुटपालन (Poultry Farming), शेळीपालन (Goat Farming), मत्स्य शेती (Fish Farming) सुरू केली आहे (Farmers Success Story).
पाण्यासाठी त्यांनी तीन शेततळी खोदली आहेत. पावसाचे पाणी या शेततळ्यांमध्ये साचते. त्यामुळे ऑक्टोबर पासून पाऊस थांबला तर नोव्हेंबरपासून बागायतीसाठी शेततळ्यातील पाण्याचा वापर करत आहेत.
याशिवाय ‘गप्पी माशांची पैदास’ (Guppi Fish Project) हा प्रकल्पही सुरू केला आहे. लागवडीला सात वर्षे झाली असून, उत्पादन सुरू झाले आहे. पाण्याच्या मुबलक वापरामुळे तसेच खते, कीटकनाशकांचा मर्यादित वापर यामुळे काजू, आंबा पिकांचा दर्जा सर्वोत्तम राखण्याकडे त्यांचा अधिकाधिक कल आहे (Farmers Success Story).
मत्स्यशेतीतून उत्पन्न (Farmers Success Story)
दोन्ही मित्र मत्स्यशेती करत आहेत. त्यामध्ये विविध प्रकारचे मासळीचे बीज टाकून उत्पन्न घेतात. शिवाय शोभिवंत मासे हा व्यवसायही सुरू आहे. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार डोके वर करतात. या आजारांचा फैलाव डासांपासून होतो. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गप्पी मासे फायदेशीर ठरतात. त्यामुळे दोन्ही मित्र गप्पी माशांची पैदास हा उपक्रम राबवत आहे. गप्पी माशांना मागणी तर आहेच शिवाय मोठ्या माशांचे खाद्य म्हणून गप्पी माशांचा खप मोठ्या प्रमाणावर होत आहे. डासांच्या निर्मुलनासाठी तर सर्वाधिक मागणी होत आहे.
कृषी पर्यटन व्यवसाय (Agri Tourism)
कोकणाला निसर्गसौंदर्याचे वरदान आहे. त्यामुळे परदेशातील पर्यटक कोकणात यावेत, त्यांनी येथील निसर्गसौंदर्याचा मनसोक्त आस्वाद घ्यावा, यासाठी दोन्ही मित्र प्रयत्नशील आहेत. शेतीला जोडून विविध व्यवसाय करतानाच कृषी पर्यटन व्यवसायही सुरू केला आहे. बागायतीमध्येच पर्यटकांसाठी निवास व्यवस्था उभारली आहे (Farmers Success Story).