हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेतकरी शेतीआधारित उद्योगांकडे (Fish Farming) वळताना दिसत आहे. प्रामुख्याने शेती करताना शेतीमध्ये उत्पादन खर्च अधिक तुलनेने मिळणारे उत्पन्न खूपच नगण्य असते. अचानक येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे तर कधी-कधी शेतकऱ्यांना केलेला खर्च मिळत नाही. ज्यामुळे शेतकरी सध्या शाश्वत मार्ग अवलंबताना दिसत आहे. आज आपण अशाच एका मासेपालन (Fish Farming) करणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. जे मासेपालन व्यवसायातून वार्षिक 10 लाखांची कमाई करत आहे.
कोलकाता येथून मागवतात मस्त्यबीज (Fish Farming Success Story)
अमित श्रीवास्तव असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते उत्तरप्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील मसौली भागातील रहिवासी आहे. अमित श्रीवास्तव सांगतात, आपण 4 वर्षांपासून मासेपालन व्यवसायात असून, 8 एकर जमिनीमध्ये तलाव निर्मिती करून आपण आपण मासेपालन व्यवसाय (Fish Farming) उभा केला आहे. विशेष म्हणजे ते स्वतः आपल्याकडे माशांच्या पिलांची निर्मिती करत असून, ही पिल्ले मोठी झाल्यानंतर ते आपल्या तलावांमध्ये सोडतात. यासाठी त्यांच्याकडे ६ छोट्या मस्त्यबीज नर्सरी आणि दोन मोठ्या मस्त्यबीज नर्सरी आहेत. याशिवाय ते काही मस्त्यबीज हे कोलकाता येथून मागवतात.
किती होते मासे उत्पादन?
शेतकरी अमित श्रीवास्तव हे बेकरी प्रजातीच्या माशांचे पालन (Fish Farming) करत आहे. ते सांगतात की, आपल्याला बेकरी या प्रजातीच्या माशांपासून एकूण 800 ते 1000 क्विंटल मासे उत्पादन मिळते. आपल्याकडील सर्व मासे हे आपण बाराबंकी आणि लखनऊ या ठिकाणी विक्रीसाठी पाठवतो. त्या ठिकाणी आपल्याला प्रति किलो बेकरी प्रजातीच्या माशासाठी 130 रुपये प्रति किलो इतका दर मिळत असल्याचे ते सांगतात. ज्यातून त्यांना वार्षिक 10 लाखांचा नफा सहज मिळत असल्याचे ते सांगतात. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या मासेपालन व्यवसायातून अनेक स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
पाण्याची शुद्धता महत्वाची
शेतकरी अमित श्रीवास्तव सांगतात, केंद्र सरकारकडून मासेपालन व्यवसाय करण्यासाठी अनेक योजना राबवल्या जातात. मात्र, आपण सरकारच्या कोणत्याही योजनेचा फायदा न घेता स्वकर्तृत्वावर मासेपालन व्यवसाय उभारला आहे. मासेपालन व्यवसायाच्या यशाचे गमक म्हणजे शेतकऱ्यांनी तलावातील पाण्याची शुद्धता राखणे खूप गरजेचे असते. अन्यथा माशांची वाढ खुंटून उत्पादनात घट होऊ शकते. असेही त्यांनी शेवटी म्हटले आहे. त्यामुळे यासारख्या अन्य महत्वपूर्ण गोष्टींची काळजी घेतल्यास शेतकऱ्यांना मासेपालनातून अधिक उत्पन्न मिळण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले आहे.