हॅलो कृषी ऑनलाईन: ICAR-CAZRI ने विकसित केलेले चारा बीट (Fodder Beet) हे कोरडवाहू प्रदेशांसाठी एक उच्च उत्पादन देणारे चारा पीक (Fodder Crop) आहे, जे 4 महिन्यांत 200 टन प्रति हेक्टर उत्पादन देते. हे चारा पीक निकृष्ट दर्जाच्या माती आणि पाण्याच्या प्रदेशातही लागवड करता येते आणि चांगले उत्पादन देते. आणि या चारा पिकाच्या लागवडीसाठी खर्च सुद्धा कमी लागतो.
कोरडवाहू भागात उच्च उत्पादन देणारे चारा बीट (Fodder Beet)
कोरडवाहू प्रदेशात (Rainfed Area), हवामानामुळे वर्षभर हिरवा चारा (Green Fodder) मिळणे एक आव्हान आहे. राजस्थानमधील जोधपुर येथील ICAR – सेंट्रल एरिड झोन रिसर्च इन्स्टीटयूटने या समस्येवर चारा बीट (Fodder Beet) हा एक एक आशादायक उपाय शोधला आहे. हे उच्च उत्पादन देणारे चारा पीक केवळ चार महिन्यांत 200 टन प्रति हेक्टर हिरवे बायोमास तयार करू शकते. विशेषतः आव्हानात्मक परिस्थितीसाठी विकसित केलेले, चारा बीट (Fodder Beet) प्रामुख्याने पशुखाद्य म्हणून वापरले जाते आणि पशुधनाच्या दुग्धोत्पादनाला (Milk Production) चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते, ज्यामुळे शेतकर्यांचे उत्पन्न वाढते. सध्या राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, छत्तिसगड, केरळ आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये त्याची लागवड केली जाते.
चारा बीटचे मुख्य वैशिष्ट्य (Features Of Fodder Beet)
- चारा बीट हे निकृष्ट दर्जाच्या पाणी आणि मातीतही पिकवता येते.
- चाऱ्याचे उच्च उत्पादन मिळते.
- पशुंची दूध उत्पादन क्षमता सुधारते.
- लागवड खर्च कमी आहे.
सर्वोत्तम चारा बीट जाती (Varieties Of Fodder Beet)
- जोमोन: ही केशरी रंगाची बीटची जात पानांचे रोग आणि अवेळी बियाणे निर्मिती सारख्या समस्येला प्रतिकारक आहे.
- मोनरो: ही लाल रंगाची बीटची जात सुद्धा अवेळी बियाणे निर्मिती सारख्या समस्येला उत्कृष्ट प्रतिकारक आहे.
- जे के कुबेर: ही केशरी रंगाची बीटची उच्च उत्पादन देणारी जात असून जनावरांना पचण्यास सोपी आणि देणारी आहे.
- जेरोनिमो: ही पिवळ्या-केशरी बीटची जात असून बुरशीजन्य रोगास सहनशील आहे.