‘या’ पिकाची शेती करून एका एकरात करा दोन लाखांची कमाई; जाणून घ्या लागवड पद्धत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन :सध्या भारतातील शेतकरी पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक शेती आणि तंत्रज्ञान आत्मसात करत शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. काही शेतकऱ्यांनी गवती चहाचे उत्पादन घेऊन एका एकरात दोन लाखांचे उत्पादन घेतले आहे. तुम्हीही गवती चहाचे उत्पादन घेऊन अशी कमाई करू शकता. यासाठी आम्ही गवती चहा ची लागवड कशी केली जाते याबाबत माहिती देत आहोत.

मेहनत कमी उत्पन्न जास्त

-गवती चहामध्ये लिंट्रासचं प्रमाण 80 ते 90 टक्के असतं.
– गवतीचहाची शेती करणारे शेतकरी यावर नैसर्गिक आपत्तीचा परिणाम होत नाही, असं सांगतात.
-प्राण्यांचा कोणताही त्रास गवती चहाला नसतो.
-गवती चहाची लागवड केल्यानंतर एकदा त्याची खुरपणी करावी लागते.
-त्यानंतर वर्षातून चार पाच वेळा पाणी द्यावं लागतं.
-यामुळे कमी मेहनत आणि जादा आर्थिक उत्पन्न असल्यानं शेतकरी गवती चहाच्या शेतीकडे वळत आहेत.

कशी कराल गवती चहाची शेती

-गवती चहाची शेती भात शेतीप्रमाणं केली जाते.
-याच्या बियांपासून नर्सरीमध्ये रोपं बनवली जातात.
-त्यानंतर रोपं वाढली की तिथून काढून जमिनीमध्ये लावली जातात.
-एका हेक्टरवर गवती चहा लावायचा असल्यास त्यासाठी रोपं तयार करण्यासाठी 4 किलो बियाणं लागते.

भारतात गवती चहाची शेती केरळ, तामिळनाडू, आसाम,पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांमध्ये होते. देशातील इतर राज्यांमध्ये गवतीचहाच्या शेतीचं प्रमाण तुलनेनं कमी आहे. तिथे देखील याची शेती करण्यासाठी प्रोस्ताहन दिलं जात आहे. गवतीचहाच्या शेतीसाठी नाबार्डकडून कर्ज देखील दिलं जाते.गवती चहाची शेती कमी पावसाच्या प्रदेशातही केली जाते.

गवती चहाचे उपयोग

गवती चहाच्या पानांपासून तेल बनवलं जाते. गवती चहाच्या तेलाला जास्त मागणी आहे. औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या गवती चहाची खरेदी करतात. औषध, सौंदर्य प्रसाधन आणि साबण बनवण्यासाठी त्याचा वापर होतो. यामध्ये व्हिटॅमिन ए अधिक असल्यान आणि सिंट्रालचं प्रमाण असल्यानं याची मागणी कायम असते. कोरोना काळात गवती चहाच्या तेलाचा वापर सॅनिटायझर बनवण्यासाठी देखील होत आहे.

शेतकरी मित्रांनो हे पण वाचा –

कर्ज हवंय? मग प्रधानमंत्री स्वामित्व योजनेचा घ्या लाभ! असा करा अर्ज..

Mukhyamantri Solar Pump Yojana 2020 | आता वीजबिलाचं टेंशन नाही, सरकार बसवून देतेय शेतीसाठी सोलार पंप; असा करा अर्ज

किसान क्रेडिट कार्डचे ‘हे’ आहेत मोठे फायदे; जाणून घ्या कार्ड कसे मिळवायचे याबाबत

पाळीव प्राणी, जनावरांना कोरोनाचा धोका किती? जाणुन घ्या पशुधन अधिकार्‍यांचे मत

लेमन ग्रास ची शेती करून मिळवू शकता मोठा नफा; जाणून घ्या कसे ते

Leave a Comment

error: Content is protected !!