Gavran Kombda : गावाकडे बरेच शेतकरी शेतीसोबत गावरान कोंबड्या पालनाचा देखील व्यवसाय करत असतात. कोंबडा, कोंबडी त्याचबरोबर कोंबडीची अंडे विकून देखील अनेकजण चांगले पैसे कमवतात. या व्यवसायामुळे शेतकऱ्याला थोड्या प्रमाणात आर्थिक सहाय्य मिळते. म्हणून बरेच शेतकरी हा व्यवसाय करताना दिसून येत आहेत. सध्या या व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत. कारण बॉयलर कोंबड्याच्या तुलनेत गावरान कोंबड्याला भाव जास्त मिळत आहे.
कोंबड्याला तर बोकडाच्या मटनापेक्षा जास्त भाव मिळत असल्याचे पाहायला मिळत आहेत. सध्या आषाढी चालू असल्याने गावातील लोक ग्रामदेवताला कोंबडा किंवा बोकड कापत आहेत. यामुळे कोंबड्याना मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कोंबड्याचे दर चांगलेच वाढल्याचे आपल्याला दिसत आहे. (Gavran Kombda)
आता श्रावण महिना देखील चालू होईल त्यामुळे अनेकजण त्याआधीच मटणावर ताव मारताना दिसत आहेत. त्यामुळे कोंबड्याला मोठी मागणी वाढलेली आहे. यामध्येच आता गावरान कोंबड्या पाळणाऱ्या व्यवसायाला चांगले दिवस आहेत. इतर कोंबड्यांच्या तुलनेत गावरान कोंबड्यांच्या सामान्य रोगांच्या विरोधात उत्तम प्रतिकार क्षमता आणि चवीला अतिशय चवदार असतात. त्यामुळे यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
शेतकरी मित्रांनो आमचे Hello krushi चे अँप मोबाईलमध्ये डाउनलोड करा आणि तुमच्या पशूंची घरबसल्या खरेदी विक्री करा. यामध्ये तुम्हाला पशूंची खरेदी विक्री तर करताच येते. त्याचबरोबर तुम्हाला कृषीविषय सर्वकाही माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे. सरकारी योजना, जमीन मोजणी, हवामान अंदाज, बाजारभाव अशी अनेक माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे आजच hello krushi हे अँप मोबाईलमध्ये इंस्टाल करा.
काही ठिकाणी तर गावरान कोंबडे खाण्यासाठी उपलब्ध देखील नाहीत. अशा लोकांना दूरवरून कोंबडे आणावे लागत आलेत. सध्या बाजारात चांगल्या कोंबड्याची किंमत ८०० ते ९०० रुपये आहे.