हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकर्यांना शेती तसेच पशुपालनासाठी (Gay Gotha Anudan Yojana) आर्थिक मदत व्हावी म्हणून गाय गोठा बांधण्यासाठी सरकारकडून (Government Scheme) गाय गोठा अनुदान योजना राबवण्यात येत आहे.या योजनेंतर्गत (Gay Gotha Anudan Yojana) 1,60,000 रुपये अनुदान स्वरुपात दिले जाते.
योजनेचे स्वरूप (Gay Gotha Anudan Yojana)
- पशुपालकांकडे (Animal Breeder) असलेल्या जनावरांची संख्या तीन असल्यास, पशुशेड (Cattle Shed Subsidy Scheme) बांधण्यासाठी शासन 75,000 ते 80,000 रुपये अनुदान देते.
- जर एखाद्या शेतकर्याकडे जनावरांची संख्या तीनपेक्षा जास्त असेल, तर या योजनेंतर्गत शेड बांधण्यासाठी सरकार 1,16,000 रूपयांची आर्थिक मदत करेल.
- तुमच्याकडे गायी आणि म्हशींची (Cow & Buffalo) संख्या जास्त असल्यास सरकारकडून 1,60,000 रुपये अनुदान दिले जाईल.
वरील प्रमाणे शेतकर्यांना आर्थिक मदत दिली जाईल, त्यामुळे त्यांना जनावरांचे शेड (Cow Shed) सहज बांधता येणार आहे.
गाय गोठा योजनेसाठी अर्ज कसा करायचा? (Gay Gotha Anudan Yojana)
- गाय गोठा योजनेसाठी सर्वप्रथम आपल्या ग्रामपंचायत ठराव मध्ये नाव समाविष्ट करावे लागेल.
- यानंतर विहित नमुन्यातील अर्ज नमुना येथे उपलब्ध आहे तो डाउनलोड करून भरावा.
- यानंतर गोठ्याचा प्रस्ताव पंचायत समिती येथे जमा करावा लागेल.
- गाय गोठ्याचा प्रस्ताव जमा केल्यानंतर आपल्या अर्जास मंजूरी दिली जाईल.
- यानंतर आपल्या ला ज्या ठिकाणी गोठा बांधायचा आहे त्या जागेचे जिओ टॅगिंग (Geo Tagging) केले जाईल.
- जिओ टॅगिंग झाल्यानंतर आपल्याला वर्क ऑर्डर दिली जाईल.
गाय गोठा अर्ज नमुना साठी या पीडीएफ वर क्लिक करा पीडीएफ
गाय गोठा योजनेत (Gay Gotha Anudan Yojana) पीडीएफ मध्ये खालील माहिती भरा
- अर्जदाराने स्वत:ची वैयक्तिक माहिती भरायची आहे व अर्जदार जो प्रकार निवडेल त्यासंबंधीचा कागदपत्राचा पुरावा जोडायचे आहे.
- लाभार्थ्याच्या नावे जमीन असल्यास हो लिहावे व 7/12 व 8 अ आणि ग्रामपंचायत नमुना 9 जोडायचा आहे. लाभार्थ्याला गावचा रहिवासी पुरावा जोडायचा आहे.
- तुम्ही निवडलेले काम तुम्ही रहिवासी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येत आहे का ते सांगायचे आहे.
- त्यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्यायचा आहे त्यासोबत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या सहीच एक शिफारस पत्र द्यावे लागणार आहे त्यात लाभार्थी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याचे सांगितले जाईल.
- त्यानंतर लाभार्थ्याच्या कागदपत्रांची छाननी करून अर्जदाराला पंचायत समितीच्या अधिकार्यांच्या सही शिक्यानुसार पोचपावती दिली जाईल.