पाऊस चांगला मात्र वन्य प्राणी आणि कीटकांनी केले हैराण ; प्रशासनाकडून उपाययोजनेची आवश्यकता !

Crop
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

तालुक्यातील पाथरी खरिपातील पिके वन्यप्राण्यांचा हल्ला व किटकांच्या प्रादुर्भामुळे नष्ट होत आहेत . यामुळे पाऊस समाधानकारक होवूनही किटक व वन्य प्राण्यांच्या संकटापुढे तालुक्यातील शेतकरी हतबल झाला आहे.

वन्य प्राण्यांसह कीटकांचा त्रास

तालुक्यात पाऊस मुबलक प्रमाणात झाल्याने बळीराजाने खरिपाची पेरणी उरकली आहे. कापुस व सोयाबीनच पिकं शेतात डोलत आहेत. परंतु हिरव्या चाऱ्याच्या शोधात असलेल्या हरिण, काळवीट, निलगाय, रानडुक्कर व इतर हिरवेखाद्य खाणारे प्राणी पिके फस्त करीत आहेत . त्याच बरोबर पिकांवर किटकांचा प्रादुभावही मोठ्या प्रमाणत होत असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

वनविभागाने लक्ष घालण्याची गरज

आर्थिक अडचणींमध्ये पेरणी करुन खरिपातून मोठ्या उत्पादनाची अपेक्षा शेतकऱ्यांनी ठेवली आहे. परंतु सायंकाळ व सकाळच्या निर्मुष्य वेळेचा फायदा घेत वन्य प्राणी कापुस व सोयाबीनच्या कोवळ्या पिकांवर ताव मारत असल्याने पेरणी केलेले शेत पुन्हा पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणारअसल्याची भिती तालुक्यातील शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे . वन विभागाने तालुक्यात हैदोस घातलेल्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पावले उचलावीत . व महसुल प्रशासनाने वन्य प्राणी व किटकांचा शिकार बनलेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे . पेरणीच्या नंतर ओढावलेल्या या संकटामुळे पाथरी तालुक्यातील बळीराज चिंतागस्त बनला असून प्रशासनाने पिकांच्या सुरक्षेसाठी वन विभागास तातडीने आदेशीत करावे अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधुन व्यक्त करण्यात येत आहे.

कापसाची लागवड व्यर्थ

तालुक्यातील चाटे पिंपळगाव शिवारात वन्य प्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत . पिंपळगाव शेतशिवारातील गट क्र . ६ ९ मध्ये महिला शेतकरी रुक्मिणीबाई एकानाथ काळे यांची शेती आहे . शेतातील कापसाच्या पिकाचे वन्य प्राणयाने मोठे नुकसान केले आहे . हजारो रुपयाचा खर्च केलेली कापसाची लागवड व्यर्थ झाली आहे . शेतात कुठे – कुठे कापसाची रोपटे उभी आहेत . परंतु अधिकाधिक पिक वन्य प्राण्याने फस्त केले आहे . प्रशासनाने सदरील नुकसानग्रस्त शेताची पाहणी करुन पिकाची नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी महिला शेतकरी रुक्मिणीबाई एकानाथ काळे यांनी प्रशासनाकडे केली आहे.