हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत. मात्र जर गवतापासून इंधनाची निर्मिती झाली तर? विश्वास बसत नाहीये ना पण हे खर आहे. लातूर जिल्ह्यातल्या शिरूर-आनंतपाळ इथे सेंद्रिय खत आणि सीएनजी गॅस निर्मितीच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. हा प्रकल्प ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. विशिष्ट प्रकारच्या गवतापासून सेंद्रिय खताची निर्मिती करण्यात येणार आहे. अशी माहिती शिवलिंग शिवाचार्य महाराज प्रोडूसर कंपनीचे चेअरमन दत्ता शिवणे यांनी दिली आहे.हा प्रकल्प उभा करण्यासाठी दहा हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांची सभासद म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांना नेपियर ग्रास ची लागवड करायला प्रोत्साहन देऊन त्यासाठी खरेदी केली जाणार आहे.
नेपियर ग्रास या गवतापासून गॅस निर्मिती
सेंद्रिय खत आणि सीएनजी आणि पीएनजी गॅस निर्मिती ही नेपियर ग्रास या गवतापासून केली जाणार आहे. त्यामुळे परिसरातील ऊस आणि सोयाबीन शेती च्या मागे लागलेल्या शेतकऱ्यांना नेपियर ग्रास उत्पादन चांगला पर्याय ठरू शकतो. नेपियर गवतापासून सेंद्रिय खत आणि सीएनजी तसेच पीएनजी गॅस निर्मिती साठी मोठा खर्च येणार आहे. हा प्रकल्प उभा करण्यासाठी 60 कोटींचा खर्च येणार आहे. शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला उभा करण्यासाठी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे दहा हजार शेतकऱ्यांनी सभासद म्हणून नोंदणी केली असून शिवलिंग शिवाचार्य महाराज प्रोडूसर कंपनीचे चेअरमन दत्ता शिवणे यांनी सांगितले आहे.
नेपियर सुपर ग्रास चे बियाणे शेतकऱ्यांना दिले जाईल नेपियर ग्रास शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येईल शेतकऱ्यांना यासाठी एका ठणाला 1000 भाव दिला जाईल. शेतकऱ्यांना एकरी वर्ष एक ते दोन लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न होईल. या कारखान्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झालेली दिसेल असं मत शिवणे यांनी व्यक्त केला आहे.शिवलिंग शिवाचार्य महाराज प्रोडूसर कंपनीचे सभासद व स्वीकारलेल्या शेतकऱ्यांना नेपियर ग्रस्त बियाणे देण्यात येईल शेतकऱ्यांनी त्याची पेरणी करायची नेपियर ग्रास ची कापणी करून ते कंपनीला दिली जाईल कंपनी त्यावर प्रक्रिया करेल आणि त्यापासून सेंद्रिय खत सीएनजी आणि पीएनजी गॅस निर्मिती होईल.