हॅलो कृषी ऑनलाईन: शेतीपूरक व्यवसायाचे (Guinea Fowls Farming) सध्या वेगवेगळे पर्याय शेतकऱ्यांसमोर येत आहेत, जे जास्त फायदेशीर आणि उपयुक्त आहेत. असाच एक व्यवसाय आहे गिनी फॉल्स फार्मिंग (Guinea Fowls Farming). गिनी फॉल्स यांना टर कोंबडी किंवा ऑस्ट्रेलियन टर्की या नावाने सुद्धा ओळखतात.
देशात शेतकरी मोठ्या प्रमाणात गिनी फॉल्स फार्मिंग (Guinea Fowls Farming) करत आहेत, यामुळे त्यांना चांगले पैसे मिळत आहेत. गिनी फाऊल (Guinea Fowls) या पक्षांना जास्त देखभालीची आवश्यकता नसते, त्यामुळे त्यांच्या संगोपनासाठी कमी खर्च येतो. गिनी फॉउलचे मांस (Guinea Fowls Meat) आणि अंडी (Guinea Fowls Eggs) कोंबडीपेक्षा जास्त किंमतीला विकली जातात, जी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. देशातील अनेक राज्यांमध्ये शेतकरी गिनीफाऊलचे मोठ्या प्रमाणात पालनपोषण करत आहेत, ज्यामुळे त्यांना चांगले पैसे मिळत आहेत. हे पक्षी एक उत्तम रखवालदार म्हणून सुद्धा ओळखले जाते. कोंबड्यांना साप, मुंगुस, घूस यापासून वाचवण्यासाठी या पक्षांचा चांगला उपयोग होतो. तुम्हालाही कमी खर्चात चांगला कमाईचा व्यवसाय करायचा असेल तर गिनी फॉल फार्मिंग (Guinea Fowls Farming) चांगला पर्याय आहे.
गिनी फॉल्स फार्मिंग एका अंड्याची किंमत 20 रुपये आहे
गिनी फाऊल आपल्या शरीराला हवामानानुसार अनुकूल बनवतो, त्यामुळे थंडी, उष्णता आणि पावसाचा त्यावर काहीही परिणाम होत नाही. कोंबडीच्या तुलनेत हा पक्षी क्वचितच हंगामी रोगांचा बळी पडतो. गिनी फॉउलचे मांस आणि अंडी कोंबडीपेक्षा चवदार असतात. बाजारात या पक्षाचे एक अंडे 20 रुपये या किमतीला विकले जाते.
गिनी फाउलचे संगोपन करण्यापूर्वी, तुमच्याकडे त्याच्या ओळखीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. गिनी फाऊल त्यांच्या तुरयावरून ओळखले जातात. मादी गिनी फॉउलचा तुरा नरापेक्षा लहान असते. जर तुम्ही याला व्यवसाय म्हणून फॉलो करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही 50 गिनी फॉउलसह देखील व्यवसाय सुरु करू शकता.
गिनी फाउलच्या अंड्याचे कवच खूप जाड असते, त्यामुळे ते तोडण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्याच वेळी, त्याची अंडी इतर पक्ष्यांच्या अंड्यांपेक्षा सुमारे दोन ते अडीच पट जाड असते आणि ती सहजासहजी खराब होत नाही. ही अंडी 15 ते 20 दिवस टिकवून ठेवता येतात.
वर्षातून 100 अंडी
गिनी फाऊल एका वर्षात सुमारे 100 अंडी घालतात. बाजारात एका अंड्याचा भाव 17 ते 20 रुपये असून मांसाला चांगली मागणी आहे. तुम्ही हा व्यवसाय (Guinea Fowls Farming) 50 गिनी फॉउलसह सुरू केल्यास, तुम्ही एका वर्षात कुक्कुटपालनापेक्षा 4 पट अधिक कमाई करू शकता.