Success Story : सालगडी झाला 5 एकर जमिनीचा मालक, आता कमावतोय लाखो! संपूर्ण गावाला दाखवली वाट

success story-5
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Success Story : हनमंतू गोपूवाड हे नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी गावचे. सालगडी ते सातबारावाला शेतकरी असा त्यांचा प्रवास थक्क करणाराच म्हणावा लागेल. त्यांच्या पासून प्रेरणा घेवून गावातल्या अनेक तरूणांना योग्य रस्ता सापडला आहे. हनमंतू गोपूवाड हे सालगडी होते. शेतात राबत राबता २० वर्षांपूर्वी एक म्हैस घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू केला. आज श्री. गोपूवाड यांच्याकडे १० म्हशी आहेत. १० म्हशींपैकी ६ म्हशी सध्या दुभत्या आहेत.

डेअरी फार्म खोलायचा आहे मात्र अनुदानासाठी अर्ज कोठे करायचा माहित नसेल तर तुम्ही आत्ताच प्ले स्टोअरवर जा आणि Hello Krushi हे अँप इंस्टाल करा. या अँपमध्ये तुम्ही सरकारी योजनांची माहिती मिळवू शकता. त्याचबरोबर अर्ज कसा करायचा याची देखील तुम्हाला माहिती मिळेल. त्यामुळे लगेचच प्लेस्टोअरवर जाऊन हे अँप इंस्टाल करा.

या म्हशींपासून सकाळी व संध्याकाळी अशा दोन्ही वेळेचे ५० लिटर दूध मिळते. हे दूध ६० रुपये लिटर प्रमाणे गावाजवळ असलेल्या हिमायतनगर मध्ये विकले जाते. त्यातून त्यांना अडीच ते तीन हजार रुपये दररोज उत्पन्न मिळते. महिन्याला खर्च वजा जाता १ लाख रुपये उत्पन्न मिळते. याच उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. या दुधापासून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांनी ५ एकर शेतजमीन घेतली आहे. मुलांचे उच्च शिक्षण आणि इतर खर्चही याच दुधाच्या उत्पन्नावर चालला आहे.

महिन्याला ८० हजार ते १ लाख रुपये उत्पन्न

दररोजचा खर्च वजा जाता दुधाच्या उत्पादनातून अडीच ते तीन हजार रुपये त्यांना मिळतात. शेतीला जोडधंदा म्हणून म्हैसपालन हा चांगला व्यवसाय आहे. याच व्यवसायातून मुलांचे शिक्षण झाले. घरखर्चही यातून दुग्ध व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून भागविण्याला जातो, असे हनमंतू गोपूवाड सांगतात.

गावातील अनेकांनी सुरू केला हा व्यवसाय

श्री. गोपूवाड यांची प्रेरणा घेऊन गावातील अनेकजण या व्यवसायात उतरले आहेत. गावामध्ये प्रत्येक जण आता दुग्ध व्यवसाय करू लागले आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून गावातील हनमंतू गोपूवाड यांच्या दुधाच्या व्यवसायाला सुरुवात केली. श्री. गोपूवाड यांच्याकडे पाहून आता संपूर्ण गाव हा दुग्ध व्यवसाय करत आहे. यातून या गावातील शेतकरी लाखो रुपयांची कमाई करत आहेत.

Rahul Bhise
Bsc ऍग्रीचे शिक्षण पूर्ण झालेले असून शेती क्षेत्रात वार्तांकन करण्यामध्ये विशेष आवड. यशस्वी शेतकऱ्यांच्या कथा, शासकीय योजना, शेती प्रश्न आदी विषयांवर लिखाण करण्यात रस.