हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील अनेक बाजार समितींना (Harbhara Rate Today) आज अक्षय तृतीयेनिमित्त सुट्टी असल्याने काही मोजक्याच बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झाली आज दिवसभरात 1920 क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. हरभऱ्याला सरासरी 05 हजार 300 रुपये ते 7 हजार 500 रुपये असा सरासरी दर (Harbhara Rate Today) मिळाला आहे.
लोकल हरभऱ्यास आज सर्वाधिक दर मुंबई बाजार समितीत (Mumbai Bajar Samiti) 7 हजार 500 रुपये एवढा दर (Harbhara Rate Today) मिळाला आहे.
पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज सर्वाधिक 1600 क्विंटल लोकल हरभऱ्याची आवक झाली. सर्व साधारण हरभऱ्याला क्विंटल मागे सरासरी 5 हजार 500 रुपये ते 6900 रुपयांपर्यंत दर मिळाला त्यानंतर सोलापूर बाजार समितीत (Solapur Bajar Samiti) आलेल्या गरडा या हरभरा वाणाला सरासरी 6005 रुपये एवढा दर मिळाला. पिंपळगाव पालखेड बाजार समितीत हायब्रीड हरभऱ्याला 6 हजार रुपये तर कल्याण बाजार समितीत 6 हजार शंभर रुपये दर मिळाला.
काबुली हरभऱ्यास (Kabuli Chana Rate Today) जालना बाजार समितीत 7 हजार 350 रुपये तर लासलगाव निफाड बाजार समिती 7 हजार 100 रुपये तर छत्रपती संभाजी नगर बाजार समिती 5 हजार 913 रुपये दर मिळाला.
आज लाल हरभऱ्याला(Lal Chana Rate) हिंगोली खाणेगाव नाका बाजार समितीत 5 हजार 925 रुपये शेवगाव बाजार समिती 5 हजार 700 रुपये तर दौंड यवत बाजार समितीत 5 हजार 300 रुपये दर मिळाला. लोकल हरभऱ्याला (Harbhara Rate Today) आज सरासरी पाच हजार आठशे रुपये ते सरासरी 7 हजार 500 पर्यंत दर मिळाला.