हॅलो कृषी ऑनलाईन | गेल्या आठवड्यात राज्यात थंडीचे प्रमाण थोडे कमी झाले आहे. आणि पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले होते. आता येत्या दोन दिवसांमध्ये कोकण आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे . रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. चंद्रपूर, कोल्हापूर, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग आणि सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पुढचे ४८ तासांत राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. नुकतीच काही पिकांची लागवड सुरू झाली आहे. आणि त्यात हवामानात झालेला बदल आणि पावसाची शक्यता यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. शेतकरी यामुळे चिंतेत आहेत.
https://twitter.com/RMC_Mumbai/status/1347114165597401091?s=08
अवकाळी पावसामुळे फळ झाडांना आलेला मोहोर गळून पडण्याची चिंता शेतकऱ्यांना आहे. भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेनं वर्तवलेल्या आंदाजानुसार ७ जानेवारी ते ९ जानेवारीपर्यंत १२ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. औरंगाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाण्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे या खात्याने सांगितले आहे. उर्वरीत राज्यात काही भागांमध्ये रिमझित पाऊस तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे.