हॅलो कृषी ऑनलाईन: पुसा एचएम4 ही बेबी कॉर्न मक्याची संकरित मक्याची जात (New Maize Variety) नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत शेतकऱ्यांसाठी प्रसारित करण्यात आलेली आहे. हा बेबी कॉर्न मका (Baby Corn) उच्च उत्पादन (High Production Corn Variety) देत असून रोगास प्रतिकारक्षम आहे. या जातीचे उत्पादन अनेक भारतीय राज्यांमध्ये, विशेषत: सिंचनाच्या अनुकुलतेत सुद्धा घेता येते. अल्प कालावधीत परिपक्वता यामुळे शेतक-यांसाठी ही जात (New Maize Variety) एक विश्वासार्ह आणि फायदेशीर पर्याय बनतो.
नवी दिल्ली येथील ICAR-भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित केलेला हा संकरित मका (Hybrid Maize Variety) भारतातील विविध राज्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. पुसा एचएम4 (Pusa HM4) हा मका (New Maize Variety) शेतकऱ्यांसाठी, विशेषत: देशाच्या पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील प्रदेशांसाठी एक उत्कृष्ट पर्याय का आहे हे जाणून घेऊ या.
पुसा एचएम4 मक्याची प्रमुख वैशिष्ट्ये
- पुसा एचएम4 ही एक संकरित मक्याची जात आहे, ज्यात वेगवेगळ्या मूळ वनस्पतींचे उत्कृष्ट गुण एकत्र करून ही जात तयार केलेली आहे, परिणामी पीक अधिक मजबूत आणि जास्त उत्पादन देणारे आहे.
- पुसा एचएम4 चे (New Maize Variety) वैशिष्ट्य म्हणजे नर वनस्पती परागकण तयार करत नाहीत (Male Sterile Maize Variety), ज्यामुळे संकरित बियाणे उत्पादनासाठी फायदेशीर आहे, कारण ते क्रॉस-परागीकरणाची प्रक्रिया सुलभ करते व पिकामध्ये एकसमानता येते.
- पुसा एचएम4 ला बेबी कॉर्न-2 म्हणूनही ओळखले जाते. याचा वापर विविध पाककृतींमध्ये वापरल्या जाणाऱ्या बेबी कॉर्नच्या उत्पादनासाठी एक आदर्श पर्याय आहे.
- मक्याची ही संकर जात बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश (पूर्व प्रदेश), पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, गुजरात, मध्यप्रदेश यासह अनेक राज्यांमध्ये लागवडीसाठी योग्य आहे. विशेषता छत्तीसगड आणि राजस्थान यासारख्या प्रदेशात ही जात शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे.
- पुसा एचएम4 ही जात खरीप हंगामासाठी सर्वात योग्य आहे. पाण्याची उपलब्धता असलेल्या प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी हा एक विश्वासार्ह पर्याय आहे.
पुसा एचएम4 मक्याची पीक आणि वाढ वैशिष्ट्ये
- ही जात (New Maize Variety) कृषी-हवामान क्षेत्रानुसार जास्तीत जास्त उत्पादन देते. ईशान्य मैदानी क्षेत्रात 19.56 क्विंटल प्रति हेक्टर, द्वीपकल्पीय क्षेत्रात 14.07 क्विंटल प्रति हेक्टर, मध्य आणि पश्चिम विभागांमध्ये 16.03 क्विंटल/हे.
- ही जात फक्त 53 दिवसात परिपक्व होते, त्यामुळे शेतकऱ्यांना एकाच हंगामात लागोपाठ वेगवगेळ्या पिकांचे नियोजन करणे शक्य आहे.
- ही जात (New Maize Variety) चारकोल रॉट (Charcoal Rot Disease Resistant Maize Variety) ज्याला सामान्य भाषेत खोक्या रोग सुद्धा म्हणतात या रोगास काही प्रमाणात प्रतिरोधक आहे. या रोगामुळे मक्याच्या उत्पादनावर लक्षणीय परिणाम होतो.