हॅलो कृषी ऑनलाईन : छंद किंवा एखादा गोष्टींचा नाद असेल तर त्याची काहीही किंमत (Horse Festival) करायला लोक तयार होतात. म्हणून म्हटले जाते की ‘शौक की कोई कीमत नहीं होती’ याच छंदातून महाराष्ट्रात शेतकऱ्यांमध्ये बैलगाडा शर्यत, टांगे शर्यत अशा शर्यती विशेष प्रसिद्ध आहेत. यासाठी लोक विशेष घोडा, बैल यासारखे जनावरे पाळतात. त्यांची खूप काळजी घेतात. मात्र, आता असाच काहीसा प्रकार पंजाबमध्ये समोर आला असून, त्या ठिकाणी घोड्यांचा महोत्सव भरवण्यात आला आहे. पंजाबच्या फरीदकोट येथे भरवण्यात आलेल्या, या सहाव्या घोड्यांच्या महोत्सवात (Horse Festival) एका तीन कोटी किंमत असलेल्या घोड्याची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे.
200 जातिवंत घोड्यांचा सहभाग (Horse Festival In Punjab)
गेल्या सहा वर्षांपासून पंजाबच्या फरीदकोट येथे हा घोड्यांचा महोत्सव (Horse Festival) भरावला जातो. यावर्षीच्या या सहाव्या महोत्सवात देशभरातील विविध राज्यांमधून जवळपास 200 जातिवंत घोड्यांनी भाग घेतला आहे. यामध्ये या महोत्सवात तीन लाखांपासून ते तीन कोटींपर्यंत घोड्यांची किंमत पाहायला मिळते. सध्या या महोत्सवात काला कांटा, बाहुबली, रुस्तम आणि पदम अशा नावांनी प्रसिद्ध असलेल्या घोड्यांनी भाग घेतला असून, त्यांची किंमत कोटींमध्ये आहे.
महोत्सवात पदम घोड्याचीच हवा
मात्र, या सर्वांमध्ये पदम या तीन कोटी किंमत असलेल्या सर्वात महागड्या घोड्याची सध्या महोत्सवात मोठी चर्चा होत आहे. पदम हा घोडा सर्व घोड्यांच्या जातींच्या तुलनेत सर्वात उंच घोडा मानला गेला आहे. पदम या घोडा उंचच नाही तर दिसायला देखील खूप रूबाबदार आहे. याशिवाय त्याच्या शरीरावर कुठेही तुम्हाला थोडा सुद्धा डाग पाहायला मिळणार नाही. असे या घोड्याचे मालक शेतकरी जसपाल सिंह सांगतात. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विजेत्या घोड्याच्या मालकाला बक्षीस म्हणून कार, मोटारसायकल अशी क्रमांकानुसार बक्षिसे दिली जातात. असेही त्यांनी म्हटले आहे.
सलमान खाननेही लावली होती बोली
आपल्या घोड्याचा खुराक स्पेशल असून, आपण त्याला खूप जपत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नाही आपल्या पदम या घोड्याला बॉलीवूड अभिनेता सलमान खान यांनी देखील खरेदीसाठी एकदा बोली लावली होती. मात्र आपण त्याला विकणार नसल्याचे पदमचे मालक शेतकरी जसपाल सिंह यांनी स्पष्ट केले होते. आपल्या घोड्याचे वय सध्या केवळ चार वर्ष असून, आपण त्याला ब्रीडिंगसाठी खूप जपणार आहे. ब्रीडिंगसाठी आपल्या घोड्याला देशातच नव्हे तर विदेशातून देखील लोक विचारणा करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.