अतिरिक्त ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार? साखर आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती

Shekhar Gayakwad
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी उसाचा हंगाम चांगलाचाच लांबल्याने चित्र आहे. अद्यापही काही शेतकऱ्यांचा ऊस हा गाळपाअभावी शेतातच आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात ऊस शिल्लक आहे त्यांना गाळपाबाबत चिंता लागून राहिली आहे. मात्र जून महिना उजाडला तरी कारखाने चालूच राहणार असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

यावेळी बोलताना साखर आयुक्त म्हणाले , यंदा राज्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र आहे. उसाचं क्षेत्र वाढल्याने यावर्षी राज्यात विक्रमी गाळप होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे गाळपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अद्याप अनेक शेतकऱ्यांचा ऊस शेतातच असल्याचे चित्र दिसत आहे, त्यामुळे मे महिना पूर्ण कारखाने सुरु राहणार आहेत. पूर्वी इतके दिवस साखर कारखाने चालू राहत नव्हते. मात्र, राज्यातील उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे, त्यामुळे हंगाम लांबला असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. अद्याप राज्यात 33 लाख टन ऊसाचे गाळप शिल्लक राहिले आहे. त्यामुळे साधारणत 10 जूनपर्यंत काही साखर कारखाने सुरु राहणार असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात ऊस गाळपाविना शिल्लक आहे. राज्यातील अहमदनगर, जालना, बीड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक आहे. दरम्यान, राज्यातील अतिरीक्त उसाचे गाळप पूर्ण होईल असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

ऊस गाळपात सोलापूर जिल्हा आघाडीवर

आत्तापर्यंत सर्वात जास्त उसाचे गाळप हे सोलापूर जिल्ह्यात झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 293.30 लाख मेट्रीन टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. तर त्याखालोखाल पुणे जिल्ह्यात 264 लाख मेट्रीन टन उसाचे गाळप झाले आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचा क्रमांक लागतो. कोल्हापूर जिल्ह्यात 253 लाख मेट्रीन टन उसाचे गाळप झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्याती साखर हंगाम जवळपास संपुष्टात आला आहे. पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप काही साखर कारखाने सुरु आहेत.

दरम्यान ,राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्यातल्या महाविकास आघाडी सरकार कडून दिलासा मिळाला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २०० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 200 रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

२०० रुपये अनुदान कोणासाठी ?

–रिकव्हरी रेट जिथे १० टक्क्यांच्या खाली असेल तिथले ऊस उत्पादक यासाठी प्रयत्न असणार आहेत.
–ऊस वाहतूक ५० किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर प्रती किलोमीटर ५ रुपयांचं अनुदानसुद्धा राज्य सरकारच्या मार्फत देण्यात येणार आहे.
–गळीत हंगाम 2021-2022 मधील अतिरिक्त ऊसाचे गाळप करण्यासाठी वाहतूक अनुदान व साखर घट उतारा अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
–या निर्णयाप्रमाणे 1 मे 2022 पासुन गाळप होणाऱ्या व साखर आयुक्तालयाने अनिवार्य वितरित केलेल्या ऊसासाठी 50 किमी अंतर वगळून वाहतूक खर्च प्रति टन प्रति किमी दर 5 रुपयांप्रमाणे मंजूर करण्यात आला आहे.