कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्याना शासकीय सेवेत सामावून घ्या- पणन मंत्री बाळासाहेब पाटील

krushi utpanna bazar samiti
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन। राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्याना शासकीय सेवेत सामावून घ्या अशा सूचना राज्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या आहेत. त्यांनी यासाठी समिती गठीत करण्यात यावी असे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ बैठकीत ते बोलत होते.

खुल्या बाजारातून मिळणारा सेस हाच बाजार समितीच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे. परंतु शासनाच्या नियमन मुक्ती धोरणामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे ज्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या धर्तीवर  तेलंगणा, तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात सुध्दा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य बाजार समिती  कर्मचारी संघाच्या वतीने यावेळी करण्यात आली.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत शासन सकारात्मक आहे आणि त्या सोडविण्यासाठी सकारात्मक आहे असे सांगत त्यांनी या सर्व अडचणी आणि कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी पणन विभागाचे सहसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात यावी तसेच या समितीने ठराविक कालावधीत आपला अहवाल शासनाकडे सादर करावा अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायदेशीर बाबी तपासून यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे.