हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी आणि शेतीशी निगडित काम करणाऱ्या अनेक संस्था (Institution For Farmers) आपण पाहील्या असतील. मात्र, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळून देण्यासाठी काही संस्था झटत असतात अशीच एक संस्था आहे ‘फार्मर्स फॉर फॉरेस्ट’ (Farmers for Forest). जाणून घेऊ या संस्थेच्या (Institution For Farmers) कार्याचा आढावा.
‘फार्मर्स फॉर फॉरेस्ट’ संस्थेचे कार्य (Institution For Farmers)
- ही संस्था मागील तीन वर्षांपासून काम करत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी जास्तीत जास्त अनुदानही (Subsidy For Farmers)मिळवून देण्याचे काम केल जाते तसेच इतर काही सुविधाही पुरवल्या जातात.
- शेतकरी आणि ग्रामपंचायतीच्या अडीच हेक्टर जमिनीवर कृषी वनीकरण (Agroforestry) करण्याचे काम, या फार्मर्स फॉर फॉरेस्ट संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे.
- त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना अनुदान दरात रोप ठिबक सिंचन सुविधाही पुरवली जाते.
- कार्बन क्रेडिटच्या (Carbon Credit) माध्यमातून शाश्वत उत्पन्न मिळवून देण्यासाठी मदत केली जाते.
- तसेच फळबाग लागवडी (Orchard Planting) द्वारे शाश्वत उत्पन्न मिळेल या सर्व गोष्टींचा फायदा मिळून देण्यासाठी ही संस्था काम करते.
संस्थेचा विस्तार आणि कार्यपद्धती (Farmers for Forest)
गेली तीन वर्षांमध्ये या संस्थेने (Institution For Farmers) दीड हजार एकरवर ‘कृषी वनीकरण’ (Agro Forest Plantation) केले आहे. शेतकरी आणि ग्रामपंचायत किंवा ट्रस्ट जमिनीसोबत काम केले जाते. महाराष्ट्रातील 6 जिल्हे आणि गुजरात मधील एका जिल्ह्यात काम करत आहे. पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, यवतमाळ आणि गडचिरोली या शहरात काम केले जाते.
ज्या शेतकर्यांची पडीक जमीन (Wasteland) आहे, त्यांच्याशी संवाद साधून फळबाग लागवडी बाबत माहिती दिली जाते. यामुळे जे शेतकरी या योजनेत सहभागी होण्यास इच्छुक असेल त्यांच्याकडून अर्ज भरून घेऊन नंतर शेतीची पहाणी केली जाते. मातीचे परिक्षण केले जाते. तर वातावरणाशी अनुकूल असणारे झाडांची माहिती दिली जाते.
तसेच अनुदान दरामध्ये ठिबक सिंचन सुविधा, चांगल्या दर्जाची रोपे, सेंद्रिय खतदेखील त्यांना दिले जाते. याचा मुख्य उद्देश फक्त झाड लावणेच नाही तर झाडे जगवणे देखील आहे. पेमेंट फॉर इको सिस्टमद्वारे (Payment For Ecosystem Services) काम केले जाते. सुरुवातीचे तीन वर्ष शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते. यातून ते झाडाची काळजी घेऊ शकतात. यामधून शेतकऱ्यांना दोन तीन पद्धतीने उत्त्पन्न मिळू शकते.
2024 ते 25 या वर्षांमध्ये साधारण 1500 ते 2000 शेतकर्यांपर्यंत पोहचून साडे तीन एकरमध्ये फळबाग लावण्याचा फार्मर्स फॉर फॉरेस्ट या संस्थेचे ध्येय आहे.
ज्या शेतकऱ्यांना या संस्थेसोबत काम करायचे आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर आणि पत्यावर संपर्क साधावा.
‘फार्मर्स फॉर फॉरेस्ट’
कुलकर्णी हाऊस, रो हाउस क्र. 3,
बाणेर म्हाळुंगे रोड, बाणेर 411045
संपर्क क्रमांक : 8999118289
या वेबसाईटला भेट द्या https://www.farmersforforests.org/