हॅलो कृषी ऑनलाईन: आजच्या लेखात आपण कमी गुंतवणूकित अधिक नफा मिळवून देणाऱ्या खरबूज लागवडीबद्दल माहिती घेणार आहोत. हे पीक कमी पाण्यावर सुद्धा घेता येते. उन्हाळ्याचा हंगाम खरबुजासाठी सर्वात योग्य असतो. जानेवारीच्या सुरुवातीपासून ते फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत याची लागवड केली जाते. जर जमीन वालुकामय असेल आणि तापमान 22 ते 26 अंश दरम्यान असेल तर पीक उत्पादन देखील चांगले येते. जर यावेळी पश्चिमेकडील वारे वाहू लागले तर फळांमध्ये अधिक गोडवा येतो. भारतात वेगवेगळ्या महिन्यात खरबुजाची लागवड केली जाते दक्षिण भारतात याची लागवड ऑक्टोबरमध्ये होते तर बिहारमध्ये त्याची लागवड डिसेंबर आणि जानेवारी मध्ये होते. तर उत्तर भारतातील इतर राज्यांमध्ये याची फेब्रुवारीपर्यंत लागवड केली जाते. खरबूज पिकवलेल्या भागांमध्ये पंजाब, तमिळनाडू, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे. तरबूज हे नगदी पीक आहे. हे फळ पिकताना कोरडे आणि पश्चिम दिशेने वाहणारे वारे फळांमधील गोडवा वाढवतात हवेतील जास्त आर्द्रतेमुळे फळ उशिरा पिता आणि रोग होण्याची शक्यता देखील वाढते.
जमिनीची गुणवत्ता पाहून वाणाची लागवड
खरबुजाची शेती आता सपाट जमिनीवर ही केली जाते. पुसा मधुरास, अर्का रहान्स, काशी मधु, दुर्गापुरा मधु, पंजाब सुनही, गुजरात खरबूजा अशा बऱ्याच जातीची आपल्या देशात लागवड केली जाते. यामध्ये शेतकरी विशिष्ट भागाच्या जमिनीची गुणवत्ता आधार मानून पीक घेत आहे. देशात हरियाणाच्या कैथल जिल्ह्यातील सिवान तहसील हे आज काल खरबूज महत्त्वपूर्ण केंद्र बनले. या तहसीलच्या अनेक खेड्यांमध्ये शेतकरी खरबुजाचे पीक घेत आहेत.
याबाबत माहिती देताना पंजाब मधील कपूरथलाचे उत्पादक शेतकरी यांनी सांगितले की, आम्ही मार्चमध्ये बाजारात खरबूज आणतो त्यासाठी पीक लागवडीचे काम डिसेंबरपासून सुरू होतं हे पीक चार ते पाच वेळा घेतला जाते. हे पीक एक आठवडा ते पंधरा दिवसात तयार होतं आणि बाजारात पोहोचतं खरबूज प्रति एकरी 150 क्विंटल ते 250 क्विंटल उत्पादन घेतले जाते. म्हणजे पाच लाख रुपये प्रति एकर माल विकला जातो. आणि दोन ते अडीच लाख रुपये कमाई होते.
-खरबूज हे इराण, अनातोलिया आणि आर्मेनियाचे मूळ आहे.
– टरबूज जीवनसत्व आणि जीवनसत्व क चा चांगला स्रोत आहे.
-यात 90 टक्के पाणी आणि नऊ टक्के कार्बोदके असतात.