Jatropha Farming: डिझेलची शेती करून तुम्ही कमावू शकता लाखो रुपये, सरकारही करतंय मदत; जाणून घ्या लागवडीबद्दल माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Jatropha Farming : शेतकरी शेती करताना नवनवीन प्रयोग करत असतात. शेतामध्ये अनेक वेगेवेगळी पिके शेतकरी घेत असतात. साधारणपणे शेतकरी पारंपरिक शेती करतात. मात्र काही शेतकरी शेतीसोबतच भाजीपाल्याची शेती देखील करतात. पण तुम्ही कधी शेतकर्‍यांना डिझेलची शेती करताना पाहिले आहे का? आज आम्ही तुम्हाला जट्रोफा प्लांटबद्दल सांगणार आहोत, ज्याला सामान्य भाषेत डिझेल प्लांट असेही म्हणतात. वास्तविक, या वनस्पतीच्या बियांपासून बायोडिझेल काढले जाते, ज्यामुळे शेतकरी चांगले उत्पन्न घेतात.

राजस्थान, उत्तर प्रदेशातील काही भागात आणि मध्य प्रदेशातील काही भागात याची लागवड चांगल्या पद्धतीने केली जाते. जट्रोफाची रोपे थेट शेतात लावली जात नाहीत, प्रथम रोपवाटिका केली जाते आणि नंतर त्याची रोपे शेतात लावली जातात. त्याच्या लागवडीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती एकदा शेतात लावली की ती तीन ते चार वर्षांपर्यंत पीक देते. त्यामुळे याची लागवड केल्यास तुम्हाला चांगला आर्थिक फायदा होईल.

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या जवळच्या रोपवाटिकेची माहिती घेऊन रोपे घ्यायची असतील तर तुम्ही लगेच प्ले स्टोअरवर जा आणि Hello Krushi हे अँप इंस्टाल करा. यामध्ये तुम्हाला रोपवाटिकांची संपूर्ण माहिती मिळेल. यासाठी तुम्हाला एक रुपया सुद्धा खर्च करावा लागणार नाही. त्यामुळे लगेचच हे अँप इंस्टाल करा.

जमीन कशी लागते?

कोणत्याही जमिनीवर याची लागवड करता येऊ शकते. मात्र पाणी साठून राहणाऱ्या जमिनीवर हे झाडाची लागवड करता येत नाही. ज्या प्रकारे पपईला जमीन लागते त्याप्रमाणेच या झाडालाही जमीन लागते.

नेमकी याची लागवड कशी केली जाते?

जट्रोफाच्या लागवडीसाठी (Jatropha cultivation) उष्णकटिबंधीय हवामान आवश्यक आहे. यासोबतच, त्याच्या लागवडीसाठी, आपल्याला अशा शेताची आवश्यकता असेल जेथे पाण्याचा निचरा योग्य असेल. कोरड्या भागात ही वनस्पती मुबलक प्रमाणात आढळते. जेट्रोफोरा ची लागवड करण्यापुर्वी तीन ते चार वेळा मशागत करणे आवश्यक आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी त्याची लागवड केली जाते.

कोणती खते वापरावीत?

5 बाय 45 सेंमी एवढ्या अंतरावर रोपाची लागवड करावी. रोपाच्या प्रत्येक खड्डयात एक पाटी कंपोस्ट खत ज्यामध्ये 200 ग्रॅम केक पावडर टाकावी. वनस्पती लागवडीच्या वेळी प्रत्येक खड्ड्यात सुमारे 20 ग्रॅम युरिया + 120 ग्रॅम सुपर फॉस्फेट + 15 ग्रॅम मराट याचे मिश्रण करुन टाकणे आवश्यक आहे.

जट्रोफाच्या बियापासून डिझेल कसे बनते? Jatropha Curcas

जट्रोफा वनस्पतींपासून डिझेल तयार करण्याची प्रक्रिया अत्यंत गहन आहे. वास्तविक, प्रथम जट्रोफा वनस्पतीच्या बिया फळांपासून वेगळ्या कराव्या लागतात, त्यानंतर बिया पूर्णपणे स्वच्छ केल्या जातात, त्यानंतर ते एका मशीनमध्ये टाकल्या जातात जिथून त्याचे तेल काढले जाते. ही प्रक्रिया मोहरीपासून तेल काढण्याच्या प्रक्रियेसारखीच आहे.

Jatropha Farming बढ़ी मांग | लाखों कमाएं | BioDiesel Farming in India | Best earning farming #kheti

डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे देशभरात त्याची मागणी वाढत आहे. भारत सरकारही शेतकऱ्यांना त्याच्या लागवडीसाठी मदत करत आहे. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांनी त्याची लागवड करून ती मोठ्या प्रमाणावर केल्यास त्यांना पारंपरिक पिकांपेक्षा चांगला नफा मिळेल.