Kankrej Cow: बघता क्षणीच प्रेमात पाडणारी ‘कांकरेज गाय’, जाणून घ्या वैशिष्ट्ये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: काही गायीच्या जाती (Kankrej Cow) एवढ्या लोभस असतात की बघताक्षणीच त्या आकर्षित करतात. अशीच गायीची एक जात (Cow Breeds) म्हणजे ‘कांकरेज गाय’. दूध उत्पादन व शेतकाम अशा दुहेरी कामासाठी (Dual Purpose Cow Breed) या जातीची गाय (Kankrej Cow) आणि बैल उपयुक्त ठरतो. जाणून घेऊ या जातीविषयी अधिक माहिती.

उगम

या जातीच्या गायी (Kankrej Cow) प्रामुख्याने गुजरातच्या (Gujrat) कच्छ रण आणि राजस्थान (Rajasthan) मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात.      

शारीरिक वैशिष्ट्ये

या गायीचा रंग सिल्व्हर राखाडी किंवा स्टील राखाडी असतो. त्यांची शिंगे लांब आणि दिसायला मजबूत, तीक्ष्ण आणि वीणेच्या आकाराची असतात, जी कोणालाही सहजपणे दुखवू शकतात. या गायीची उंची सुमारे 125 सेमी आहे, तर बैलांची उंची 158 सेमी आहे. कांकरेज गायीचे (Kankrej Cow) वजन 320 ते 370 किलो पर्यंत असते. पूर्ण वाढ झालेल्या बैलाचे वजन 500 ते 550 कि.ग्रॅ असते.

प्रजो‍त्पादन आणि दूध उत्पादन

या गायीचे प्रथम माजावर येण्याचे वय सुमारे 30 ते 36 महिने एवढे असते.

या गायींचा दूध (Milking Period) देण्याचा कालावधी 270 ते 300  दिवस असून, एका वेतात 1750 ते 1800 लिटर दूध देतात. दिवसाकाठी सर्वसाधारण 6 ते 7 लिटर दूध सहज देतात. या गायीचे सरासरी आयुष्य 20 ते 22 वर्ष असते.            

इतर वैशिष्ट्ये

भारतीय गायीमधील प्रथम बघताचक्षणी प्रेमात पडावे असा लोभस गोवंश म्हणजे कांकरेज गोवंश (Kankrej Cow) होय. ह्या गायीने त्याच्या अंगच्या गुणवत्तेने परदेशीयांना सुद्धा संशोधन करण्यास भाग पाडले आहे. आर्यांनी ज्यावेळी आक्रमण केले त्यावेळी त्यांच्या बरोबर असलेला गोवंश म्हणून या गायीची नोंद आहे. कमी पावसाच्या प्रदेशात निकृष्ट अन्नावर पोषण होऊन देखील उत्तम गुणवत्ता सिद्ध करणे हे या गायीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. सरकारने या गायीचे महत्त्व जाणून पोस्टाचे रु. 3/- चे टपालाचे तिकीट काढले आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.