Crop Competition: कृषी विभागाकडून खरीप हंगाम ‘पीक स्पर्धेचे’ आयोजन!  जाणून घ्या याविषयी सविस्तर…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यात पीक स्पर्धेचे (Crop Competition) आयोजन कृषी विभागाकडून (Agriculture Department) करण्यात येत आहे. राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकर्‍यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. त्याचबरोबर राज्याच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना (Farmers) पीक उत्पादनामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. तर याही वर्षी 11 पिकांसाठी खरीप हंगाम (Kharif Season) पीक स्पर्धेचे (Crop Competition) आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त उत्पादन काढणार्‍या शेतकऱ्यांना सन्मान कृषी विभागाकडून करण्यात येणार आहे. 

दरम्यान, या वर्षी सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल ही 11 पिके घेणार्‍या शेतकऱ्यांना या पीक स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार आहे. या पीक स्पर्धेसाठी (Crop Competition) जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी सहभाग घेण्याचा आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. 

पीक स्पर्धेसाठी (Crop Competition) अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 

  • मूग व उडीद पि‍कासाठी – 31 जुलै 
  • भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी – 31 ऑगस्ट

पीक स्पर्धेची ठळक वैशिष्टे

  • स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पि‍कासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु.300 व आदिवासी गटासाठी रक्कम रु. 150 राहिल.
  • स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकर्‍याकडे स्वत:च्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे.
  • स्पर्धेत भाग घेणार्‍या शेतकर्‍याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.
  • पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरिता स्पर्धकास स्वत:च्या शेतावर स्पर्धेकरिता सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकाची भात पिकाच्या बाबतीत किमान 20 आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान 40 आर (1 एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
  • पीक स्पर्धा (Crop Competition) तालुका स्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुका स्तरावरील पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकर्‍यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

  • विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ)
  • ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन
  • 7/12, 8-अ चा उतारा
  • जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास)
  • पीक स्पर्धेसाठी शेतकर्‍याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा
  • बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत

या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, संकेतस्थळ- www.krishi.maharashtra.gov.in किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.